शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पश्चिमेवर राष्ट्रवादीचाही डोळा, काँग्रेसकडून मात्र उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 00:49 IST

जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात कोण उमेदवार उभे करणार, याबाबतचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात आहेत.

कल्याण : जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघात कोण उमेदवार उभे करणार, याबाबतचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात आहेत. काँगे्रसने उमेदवार घोषित केला असला तरी, राष्ट्रवादीने कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी फिल्डिंग लावली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते हे पश्चिम व कल्याण पूर्व मतदारसंघातून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वरिष्ठांनी तसे आदेश दिल्याचा दावा हनुमंते यांनी केला आहे.काँग्रेसने बुधवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर केली. यात कल्याण पश्चिममधून कांचन कुलकर्णी, तर डोंबिवलीतून राधिका गुप्ते यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण ग्रामीण आणि पूर्व मतदारसंघांतील उमेदवारांची नावे काँग्रेसच्या यादीत नसल्याने हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याचे बोलले जात आहे. परंतु, राष्ट्रवादीने या मतदारसंघांसाठी उमेदवार घोषित केलेले नाहीत. हनुमंते यांनी कल्याण पश्चिमसाठी आधीपासूनच फिल्डिंग लावली होती. परंतु, तो काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने ते नाराज झाल्याची चर्चा असून, त्यांनी पश्चिमसह पूर्व मतदारसंघात गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे.आघाडीत काही जागांवरून तिढा असल्याने पक्षाच्या आदेशानुसारच उमेदवारी अर्ज दाखल करीत असल्याचे हनुमंते यांनी सांगितले.आघाडीचा धर्म त्यांनी पाळावाआघाडीतील जागावाटपानुसार कल्याण पश्चिम आणि डोंबिवली असे दोन मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व आणि ग्रामीणला राष्ट्रवादीने उमेदवार द्यावेत. रमेश हनुमंते यांना त्यांच्या पक्षाने काय आदेश दिले, याची कल्पना नाही. परंतु, आघाडीत निवडणूक लढवताना त्यांनी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-west-acकल्याण पश्चिम