शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन; महापालिकेतील भोंगळ कारभाराचा निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 00:53 IST

राष्ट्रवादीचे बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांविरोधात आंदोलन, ठामपाचा निषेध : प्रशासनाचे वेधले लक्ष

मुंब्रा : ठामपा हद्दीमध्ये ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना बघून घाबरू नका. ते बंद आहेत. महापालिका सुस्त, ठेकेदार मस्त, असे फलक लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी मुंब्य्रात अनोखे आंदोलन केले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अशरफ तथा पक्षाचे युवाध्यक्ष पठाण यांनी बंद असलेल्या कॅमेऱ्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले.

ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर बसवलेले हे कॅमेरे सध्या बंद आहेत. प्रभाग सुधारणा निधीतून १२०० आणि वायफाय योजनेतून १०० असे एकूण १,३०० तसेच अन्य निधीतून १०० कॅमेरे बसविले आहेत. याशिवाय, ३०० ते ४०० कॅमेरे आणखी बसविण्यात येणार होते. यामुळे रस्त्यांवर घडणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्हेगारीला आळा बसेल, या हेतूने ही योजना राबविली होती. या योजनेंतर्गत बसविलेले शहरातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुंब्रा-कौसा आणि दिव्यातील १०० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा दावा पठाण यांनी केला. याबाबत ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाशी संपर्क साधल्यानंतरही त्यावर कार्यवाही होत नसल्याने संतप्त होऊन त्यांनी हे आंदोलन केले.

गुन्हा घडल्यास छडा कसा लावणार? एकीकडे गुन्हे वाढू नये, अशी अपेक्षा करीत असतानाच दुसरीकडे गुन्हेगारांना मोकळे सोडण्याचे हे धोरण आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. नुकत्याच राबोडीत झालेल्या हत्येची उकल करण्यासाठी तेथे लावलेल्या कॅमे-यांचा वापर झाला. त्यामुळे आरोपींना पकडणे सोपे झाले. कॅमेरे बंद असलेल्या ठिकाणी एखादा गुन्हा घडल्यास त्याचा छडा कसा लावणार, असा सवाल करून लावण्यात आलेले कॅमेरे आठ दिवसांत सुरू न केल्यास ते विद्युत विभागाच्या ठिकाणी फेकण्यात येतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस