राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 14, 2016 04:17 IST2016-11-14T04:17:01+5:302016-11-14T04:17:01+5:30
बँकेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करून पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर मुंब्रा पोलीस

राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
मुंब्रा : बँकेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करून पोलीस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रेल्वे स्थानकाजवळील कॅनरा बँकेने शनिवारी दुपारी २ वाजता बँक बंद केली. त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या संतप्त नागरिकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बँकेजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र मांक-४ वर हमको पैसा चाहिए, अशा घोषणा देऊन रास्ता रोको आंदोलन केले होते. (वार्ताहर)