राष्ट्रवादी महिला काँग्रेसने प्रवीण दरेकरांच्या फोटोला मारले जोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST2021-09-16T04:50:14+5:302021-09-16T04:50:14+5:30

ठाणे : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाला रंगलेल्या गालाचे मुके घेण्याची ...

NCP Women's Congress kills Praveen Darekar's photo | राष्ट्रवादी महिला काँग्रेसने प्रवीण दरेकरांच्या फोटोला मारले जोडे

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने प्रवीण दरेकरांच्या फोटोला मारले जोडे

ठाणे : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाला रंगलेल्या गालाचे मुके घेण्याची सवय आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी ठाण्यात दरेकर यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील आणि प्रदेश सचिव शशिकला पुजारी यांनी केले.

लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर बोलत असताना दरेकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. येत्या ४८ तासात आपल्या विधानाबद्दल दरेकर यांनी माफी मागितली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा पुजारी यांनी दिला.

Web Title: NCP Women's Congress kills Praveen Darekar's photo