शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

त्या चौकशी समितीधून भाजपासह राष्ट्रवादीही पडणार बाहेर, थीम पार्कचे प्रकरण आले वेगळ्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 15:07 IST

चौकशी समितीच्या माध्यमातून थीम पार्क प्रकरणाची चौकशी सुरु होण्यापूर्वीच या समितीमधून विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या गटनेत्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची भुमिका संशयास्पदभाजपा आणि राष्ट्रवादीने दिले टेक्नीकल पर्सन नसल्याचे कारण

ठाणे - ठाण्यातील थीम पार्क व बॉलिवूड पार्कच्या चौकशीसाठी समिती नेमली असतांना आता चौकशी सुरु होण्यापूर्वीच या समितीवर आक्षेप घेत भाजपाचे गटनेते नारायण पवार, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी या समितीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेचे सेवा निवृत्त अधिकारी गिरीश मेहंदळे यांनीसुध्दा या समितीत काम करण्यासाठी नकार देणारे पत्र पालिकेला दिला आहे. त्यामुळे ही समितीच आता अर्धवट स्थितीत आली असून चौकशीचा केवळ फार्स होणार की काय अशी चर्चा मात्र या निमित्ताने सुरु झाली आहे.                 मागील काही दिवसापासून बॉलीवुड आणि थीम पार्कच्या मुद्यावरुन ठाणे शहर चांगलेच चर्चेत आले आहे. परंतु आयुक्तांनी चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या ठेकेदाराची भेट घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी शिवसेनेची नेतेमंडळी या ठेकेदाराची भेट घेत असल्याचे प्रकरण समोर आणले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तर भाजपाने सुध्दा सत्ताधारी आणि प्रशासनावर याच मुद्यावरुन आगपाखड केली आहे. अशा प्रकारे सत्ताधारी आणि प्रशासन त्या ठेकेदाराबरोबर भेटीगाठी घेत असतील तर या प्रकरणाची पारदर्शक चौकशी कशी होणार असा सवाल भाजपाचे गटनेते नारायण पवार आणि माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी उपस्थित केला आहे.                  दरम्यान आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सत्ताधारी आणि प्रशासन ठेकेदाराला भेटण्याच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर भाजपाचे गटनेते नारायण पवार आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी या प्रकरणाच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. सत्ताधारी आणि प्रशासन ठेकेदाराची भेट घेणार असेल तर चौकशी काय होणार असा प्रमुख आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच आम्ही टेक्नीकल पर्सन नसल्याने या चौकशी समितीत राहून काय करणार असा मुद्दा उपस्थित करीत या दोघांनी समितीमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही टेक्नीलक पर्सन नाही, त्यात सत्ताधारी आणि प्रशासन ठेकेदाराची भेट घेत असतील तर चौकशी काय होणार, त्यामुळेच मी समितीमधून बाहेर पडत आहे.(नारायण पवार - गटनेते - भाजपा) 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा