राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST2021-07-19T04:25:09+5:302021-07-19T04:25:09+5:30

आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि बदलापूर शहरात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर रहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...

NCP review meeting | राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि बदलापूर शहरात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर रहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आढावा बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली ही आढावा बैठक यशस्विनी भवन येथे पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. मागील २ वर्षांत शहरात राष्ट्रवादीमार्फत करण्यात आलेले काम हे कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता २ वर्षांत शहरात राष्ट्रवादीची ताकद अजून वाढेल, असा विश्वास आशिष दामले यांनी व्यक्त केला. यावेळी विनय सरदार, संकेत पाटेकर, अनिकेत आवटे अभिषेक गुप्ता यांच्यासह अनेक तरुणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या बैठकीवेळी अविनाश देशमुख, प्रभाकर पाटील, अनिल मराडे, सुदाम घुगे, निखिल मोहिते, भूषण कराळे, संजय कराळे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------

Web Title: NCP review meeting