शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी, सेनेचे शक्तिप्रदर्शन, भाजपावर टीका : जागावाटपाचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:51 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मुरबाड मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे आठ गट आणि पंचायतीच्या १६ गणांच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा सोमवारी करण्यात आली.

मुरबाड : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मुरबाड मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे आठ गट आणि पंचायतीच्या १६ गणांच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा सोमवारी करण्यात आली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत या निवडणुकीचा बिगुल फुंकला.या युतीची घोषणा करण्यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सभा घेऊन भाजपा सरकार च्या फसवेगिरीवर तोफ डागली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी आमदार गोटीराम पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राम दळवी, सुभाष पवार, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते.जरी युती झाली असली, तरी जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. कोण कुठल्या जागा लढवणार हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी निश्चित होईल. असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. जागावाटपाचा तिढा सुटला नसला, तरी युती कायम राहील, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला.सेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज भरले असले, तरी एबी फॉर्म मिळाल्यानंतरच उमेदवार निश्चित होणार आहेत. अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. भाजपाचे सर्व उमेदवार तेव्हाच अर्ज भरणार आहेत. काँग्रेस, मनसे, रिपब्लिकनचेही अर्ज त्याचवेळी दाखल होतील. यामुळे मंगळवारीच रणसंग्राम कसा असेल ते स्पष्ट होईल.नेते आणणार रंगत : या निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उतरणार असल्याने यंदाची ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. त्यातच शिवेसना आणि भाजपा वेगळे लढत असल्याने त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांत जोरदार टीका होण्याची चिन्हे आहेत.अर्ज भरण्यापूर्वी मुरबाड येथे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तेव्हा दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. निवडणुक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेसाठी १३ आणि पंचायत समितीसाठी १३ अर्ज सोमवारी दाखल झाले.काँग्रेसच्या भूमिकेकडे भिवंडी तालुक्यात लक्षभिवंडी/अनगाव : आजवर शिवसेनेसोबत असलेली श्रमजीवी संघटना फोडून भाजपाने भिवंडी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचा चंग बांधला असला तरी शिवसेनेनेही तेवढीच ताकद लावल्याने भिवंडी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या तालुक्यात काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार यावर सर्व समीकरणे अवलंबून आहेत.भिवंडी महापालिका निवडणुकीपासून काँग्रेस आणि शिवसेना परस्परांसोबत आहेत. पण सध्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिली आहे. श्याम गायकवाड यांची सेक्युलर आरपीआयही त्यांच्यासोबत आहे. श्रमजीवी संघटनेसोबतच रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष भाजपासोबत आहे. काँग्रेस आणि मनसे हे पक्ष सध्या स्वबळावर आहेत.त्यामुळे काँग्रेसने काही प्रमाणात शिवसेनेला मदत करावी, असे प्रयत्न त्या पक्षातर्फे सुरू आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसच्या मदतीसाठी प्रयत्न केले होते. तसे झाले आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या, तर त्याचा फायदा उठवण्याचा या पक्षांचा प्रयत्न आहे.शहापुरातही छुप्या युतीची चर्चाशहापूर : मुरबाडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची उघड युती झाली असती तरी शहापूरमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष छुप्या युतीच्या तयारीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. त्यांना भारिपाने साथ दिली आहे. शिवाय कुणबी सेनाही त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे नेमकी राजकीय समीकरणे मंगळवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.श्रमजीवी संघटनेने सेनेची साथ सोडून भाजपाला सोबत केली असली, तरी त्या संघटनेची शहापुरातील स्थिती भिवंडीइतकी भक्कम नाही. सोमवारपर्यंत जि.प. गटांसाठी १७ तर पं.स.साठी ३८ जणांनी अर्ज दाखल केले.गेल्यावर्षी स्वत:चा भक्कम राजकीय प्रभाव दाखवणाºया कुणबी सेनेने यावेळी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभागरचनेतील बदलाचा फटका त्यांना बसला असला तरी कुणबी समाजाची भूमिका म्हणून ते काँग्रेससोबत आहेत.उमेदवारी नाकारल्याने राजीनामाअंबाडी : अनेक वर्ष पक्षनिष्ठेने काम करूनही जिल्हा परिषद निवडणुकीत अंतिम क्षणी उमेदवारी डावलल्याने भाजपा ठाणे जिल्हा सरचिटणीस अनंता भोईर व त्यांच्या पत्नी जयश्री भोईर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. जयश्री या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत.अनंता भोईर जिल्हा परिषदेच्या शेलार गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र पक्षातर्फे शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या भिवंडी तालुक्यातील उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नाही. त्यांना डावलत शिवसेनेतून आलेल्या अरूण भोईर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे नाराज भोईर दांपत्याने आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.सेनेच्या सुभाष घरत यांना भाजपाची आॅफरलोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षविरोधी काम केल्याचे कारण देत उपजिल्हाप्रमुख सुभाष घरत यांची पक्षातून तसेच उपजिल्हाप्रमुखपदावरून हकालपट्टी केल्याचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसची युती झाल्याचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी जाहीर केले. मात्र, सेनेला हवी असलेली धसई जिल्हा परिषदेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्याने सुभाष घरत नाराज होते. दोन दिवसांपासून ते संघटनेच्या कामात सहभाग न घेता स्वतंत्र भेटीगाठी घेऊन पक्षविरोधी काम करत असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आल्याने २६ नोव्हेंबरला जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील मुरबाडमध्ये आले असता त्यांनी घरत यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर करून तसे पत्र प्रसिद्धीस दिले. याबाबत, सुभाष घरत यांना विचारले असता, धसई गटातील जागा मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला दिल्याने मी सेना सोडली आहे. आता आपल्याकडे भाजपाची आॅफर असल्याचे ते म्हणाले.शिवसेनेचे इंद्रपाल तरे यांचा राजीनामाभिवंडी : तालुक्यातील चौधरपाडा शिवनगर येथील शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख इंद्रपाल तरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी सोपवला. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक निमित्ताने लोनाड गटातून उमेदवारीसाठी दावेदार असताना त्यासाठी पूर्वतयारी केली होती.मात्र ऐन निवडणुकीत तिकीट वाटपातून वगळल्याने राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस