राष्ट्रवादीचे पदाधिकारी चांदवानी यांनाही धक्काबुकी; उल्हासनगरात पैशाच्या वादातून हाणामारी
By सदानंद नाईक | Updated: June 19, 2023 18:34 IST2023-06-19T18:34:25+5:302023-06-19T18:34:47+5:30
याप्रकरणी जयराम चांदवानी, सन्नि चांदवानी, रमेश व अनोळखी इसमा विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी चांदवानी यांनाही धक्काबुकी; उल्हासनगरात पैशाच्या वादातून हाणामारी
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील पवित्रा हॉटेल मध्ये पैशाच्या वादातून शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता ओमप्रकाश सिधवानी यांच्यासह पुतण्या गुलशन सिधवानी व राष्ट्रवादीचे ठाकूर चांदवानी याना मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जयराम चांदवानी, सन्नि चांदवानी, रमेश व अनोळखी इसमा विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील पवित्रा हॉटेल मध्ये शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान गुलशन शिधवानी, ओमप्रकाश सिधवानी बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या जयराम चांदवानी, सान्नि जयराम चांदवानी, रमेश व एका अनोळखी इसमाने संगनमत करून ओमप्रकाश सिधवानी यांना पैशाच्या वादातून मारहाण सुरू केली. तसेच गुलशन सिधवानी यांनाही मारहाण केली. त्यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे ठाकूर चांदवानी यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना धक्काबुकीं झाली.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जयराम सिधवानी, सन्नि सिधवानी, रमेश व एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला असून जखमी ओमप्रकाश सिधवानी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये अद्याप कोणालाही अटक झाली नसून सीधवानी व चांदवानी या फिर्यादी व आरोपी मध्ये समझोता घडून आणण्यात पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.