शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

राष्ट्रवादीचे नेते वसंतराव डावखरे यांची प्रकृती गंभीर, नेत्यांची रीघ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 7:10 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांना प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल केले आहे.

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांना प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही गुरुवारी त्यांची भेट घेतली. प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुत्रपिंडाच्या विकाराने ते ग्रस्त असून त्यांच्यावर अलिकडेच ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात मुत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना संसर्गाचा त्रास झाल्यामुळे गेली अनेक दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे. घरीही त्यांच्यावर उपचार सुरुच होते. बुधवारी पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. गुरुवारी श्वसनाचाही त्रास झाल्याने त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.नेत्यांची रीघडावखरे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ठाणे, मुंबई आणि पुण्यातील अनेक राजकीय नेत्यांनी गुरुवारी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विधानसभा निवडणूकीत त्यांचे पुत्र आमदार निरंजन यांचा ठाणे शहर मतदारसंघातून पराभव झाल्यानंतरही त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली होती. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे तसेच त्यांच्या भेटीसाठी येणाºयांवर काहीशी मर्यादा ठेवली होती. अगदी अलिकडेच ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळीही त्यांची प्रकृती फारशी व्यवस्थित नव्हती, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस