शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेहून हवेने पोट भरणारं मशीन मागवा; महागाईवरून जितेंद्र आव्हाडांचा उपरोधिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 22:27 IST

सध्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महागाईवरून बोलताना केंद्र सरकारला उपरोधिक टोला लगावला आहे. "अमेरिकेने हवेतून पोट भरणारं मशीन शोधलं असून ही मशीन लवकरच भारतातही लॉन्च होणार आहे. त्यामुळे महागाई कितीही वाढली, तरी काळजी करू नका," असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले आहेत. डिझेलचा दर १०० रुपये, तर पेट्रोलचा दर तब्बल १२० रुपये प्रति लिटरच्या घरात जाऊन पोहोचला आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. महागाईच्या या भडक्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळून निघाला आहे . याबाबत अंबरनाथमध्ये आलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सरकारला उपरोधिक टोला लगावला. 

"अमेरिकेत सध्या हवेतून पोट भरणारं मशिन विकसित करण्यात आली आहे. लवकरच ही मशीन भारतातही लॉन्च होणार आहे. त्यामुळे महागाई कितीही वाढली, पेट्रोल अगदी अडीचशे-तीनशे रुपये लिटर जरी झाले, तरी यापुढे काळजी करू नका, हवेतून पोट भरणारी मशीन मागवा आणि निश्चिंत व्हा," असा उपरोधिक टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला लगावला. 

शर्यतीचा बैल आव्हाडांच्या ताफ्यातील पोलीस गाडीवर धडकलाअंबरनाथच्या ग्रामीण भागातील बहनोली गावात आज गुढीपाडव्यानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आले होते. त्यांच्या गाडीच्या ताफ्यातील पोलीस निरीक्षकाच्या गाडीवर शर्यतीचा बैल थेट धडकल्याने अपघात घडला. सुदैवाने या अपघातात गाडीत बसलेल्या पोलीस अधिकारी यांना कोणतीही दुखापत झाली नाही, तर बैलाला किरकोळ दुखापत झाली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPetrolपेट्रोलDieselडिझेल