राष्ट्रवादीकडून उल्हासनगरमध्ये कब्रस्तानची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST2021-09-06T04:44:19+5:302021-09-06T04:44:19+5:30

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा आहुजा यांनी कॅबिनेट मंत्री नबाब मलिक यांची भेट घेऊन शहरात कब्रस्तानची मागणी केली आहे. ...

NCP demands graveyard in Ulhasnagar | राष्ट्रवादीकडून उल्हासनगरमध्ये कब्रस्तानची मागणी

राष्ट्रवादीकडून उल्हासनगरमध्ये कब्रस्तानची मागणी

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा आहुजा यांनी कॅबिनेट मंत्री नबाब मलिक यांची भेट घेऊन शहरात कब्रस्तानची मागणी केली आहे. मुस्लिम समाजाची संख्या बघता शहर पूर्वेत कब्रस्तानची मागणी होत आहे.

उल्हासनगरात ५० हजारांपेक्षा जास्त मुस्लिमांची संख्या असून मुस्लिम समाजाच्या सततच्या आंदोलनानंतर शहाड फाटक उल्हास नदी किनारी महापालिकेने कब्रस्तान दिले. शहर पूर्वेतील मुस्लिम समाजाला १३ कि.मी. लांब असणाऱ्या उल्हास नदी किनाऱ्यावरील कब्रस्तानमध्ये जनाजा घेऊन जावे लागते. त्यामुळे शहर पूर्वेला कब्रस्तान देण्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्षा सीमा आहुजा यांनी समाजसेवक व उद्योगपती महेश आहुजा यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांची शनिवारी भेट घेऊन कब्रस्तानची मागणी केली. आहुजा यांच्या मागणीने पुन्हा कब्रस्तानचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री यांनी शहरातील प्रमुख नेते व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महेश आहुजा यांनी दिली.

Web Title: NCP demands graveyard in Ulhasnagar