शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या घटनेचा असाही निषेध, राष्ट्रवादीने केला शिवरायांना दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 13:46 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने केला शिवरायांना दुग्धाभिषेक, बसवराज बोम्मई यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन

ठळक मुद्देकर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल  झाला होता.

ठाणे : कर्नाटकातछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर कर्नाटकचेमुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही छोटी घटना असल्याचे विधान केल्याच्या निषेधार्थ शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. तसेच बोम्मई यांच्या प्रतिमेला चप्पलांनी मारले. 

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल  झाला होता.  त्यावर प्रतिक्रिया देताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं धक्कादायक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी केलं होतं. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत बसवराज यांच्या प्रतिमेस जोडे मारले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली. तर अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मुफ्ती सय्यद अश्रफ यांनी, नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या समाजकंटकांनी हे कृत्य केले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आहे. पुतळ्याला अभिषेक करण्यासाठी गेलेल्या लोकांना अडविणे योग्य नाही. आम्ही छत्रपतींना दैवत मानतो. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. 

दरम्यान, या आंदोलनात महिला शहराध्यक्ष सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, सरचिटणीस रवींद्र पालव, सरचिटणीस प्रभाकर सावंत,रविंद्र पालव, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, परिवहन सदस्य  नितीन पाटील, कैलाश हावले आणि मुफ्ती अशारफ सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेस