शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

Video - राष्ट्रवादीचे सरकारविरोधात ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 16:16 IST

ठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ असा नारा देत ढोल ताशांचा गजर करण्यात आला.

ठळक मुद्देठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ असा नारा देत ढोल ताशांचा गजर करण्यात आला.भाजपा सरकारच्या कार्यकाळात केवळ महाराष्ट्रातच जवळपास एक लाख 42 हजार कंपन्या बंद झाल्याने लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले.राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या या आंदोलनांत मोठ्या संख्येने युवा सामील झाले होते.

ठाणे - देशात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून दिवसेंदिवस कंपन्या बंद होत असल्याने अनेकांचे रोजगार हातातून निसटू लागले आहेत. त्या निषेधार्थ सोमवारी (8 जुलै) ठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ असा नारा देत ढोल ताशांचा गजर करण्यात आला. दरम्यान, कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आज ठाण्यात ढोल वाजवले असले तरी वर्षावरही ढोल वाजवायला मागे हटणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला. 

भाजपा सरकारच्या कार्यकाळात केवळ महाराष्ट्रातच जवळपास एक लाख 42 हजार कंपन्या बंद झाल्याने लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले तरीही हे सरकार कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होत नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष रविकांत वर्पे , प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे- नवी मुंबई प्रभारी अभिषेक बोके, ठाणे शहराध्यक्ष मोहसीन शेख, कार्याध्यक्ष संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली  ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर ढोल ताशांचा गजर करण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या या आंदोलनांत मोठ्या संख्येने युवा सामील झाले होते. फडणवीस सरकार व भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी बूट पॉलिश, छत्री दुरुस्ती, चणेवाला असे नानाविध भूमिका साकारुन भाजपा सरकारवर  यावेळी मेहबूब शेख यांनी सांगितले की, बेरोजगारांना या सरकारने रोजगार दिलेला नाही. आज बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील 1 लाख 42 हजार कंपन्या बंद पडल्या आहेत. यावरुन हेच लक्षात येते की नवीन रोजगार सोडा किती लोक बेरोजगार झाले असतील. म्हणून या बेरोजगारीच्या विरोधात आम्ही सातत्याने आंदोलने करतोय. पण, हे फडणवीस सरकार कुंभकर्णाच्या झोपेत आहे. अणि या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आम्ही ढोल वाजवतोय; आज आम्ही ठाण्यात ढोल वाजवलेत ; जर, तत्काळ रोजगारनिर्मिती केली नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर येऊन ढोल वाजवायला मागे पुढे पाहणार नाही.  

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, सामाजिक न्याय विभागाचे ठाणे अध्यक्ष कैलास हावळे, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, प्रदेश कार्यकारीणी सदस्य हैदर शेख, रवींद्र पालव, राहुल सिंग, दीपक पाटील, सुधीर शिरसाठ, अनिकेत चोरमले, सिद्धांत वटकर, करणा पाटील, संतोष मोरे, अजय मिश्रा, रोहित भंडारी, जावेद शेख, संदीप पवार  मौजम खान, तन्मय पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाjobनोकरी