शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिस्तीच्या नावाखाली एनसीसी कॅडेट्सना बेदम मारहाण; जोशी-बेडेकर काॅलेजमधील घटना; व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 06:24 IST

संबंधित मुलांचे जबाब नोंदवित असून त्यांनी तक्रार केल्यास प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे : येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिस्तीच्या नावाखाली वरिष्ठ एनसीसी कॅडेट शुभम प्रजापती याने बांबूने अमानुष मारहाणीची शिक्षा केल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे. गुरुवारी त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. कनिष्ठ विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा तीव्र शब्दांत ठाणेकरांनी धिक्कार केला. 

संबंधित मुलांचे जबाब नोंदवित असून त्यांनी तक्रार केल्यास प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. ठाण्यातील जोशी-बेडेकर, बांदोडकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना एनसीसीचे संयुक्त प्रशिक्षण देण्यात येते. लष्कर, नौदल प्रशिक्षणाचे धडे देताना विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यास त्यांना शिक्षा करण्यात येते.  प्रशिक्षणातील चुकीसाठी पाण्यात ओणवे उभे राहायला सांगून भर पावसात विद्यार्थ्यांच्या पार्श्वभागावर प्रजापती याने बांबूने फटके दिले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीमहाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेऊन चौकशी केली. 

मारहाणीची घटना वाईट आहे. कोणी कोणाला मारू नये. विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. चांगले-वाईट घडत असते, मी कोणाचे समर्थन करत नाही. जे घडले ते चुकीचे आहे. महाविद्यालयाने या घटनेची दखल घेतली आहे. जो मारतोय त्याचेही समुपदेशन होणे गरजेचे आहे, शिस्त लावण्याची ही पद्धत नाही. त्याच्यावर अवश्य कारवाई व्हायला पाहिजे. - डॉ. विजय बेडेकर, अध्यक्ष, विद्या प्रसारक मंडळ

मारहाणीचा प्रकार कधी घडला, ती कोणाकोणाला झाली, हा प्रशिक्षणाचा भाग आहे की, यात वेगळा काही उद्देश आहे या सर्व बाबी विद्यार्थ्यांकडून तपासल्या जात आहेत. त्यांचे जबाब नोंदविले जात आहेत. अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही.- गणेश गावडे, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर

माजी विद्यार्थिनीने काढला व्हिडीओ, तक्रार नाही- मारहाणीची घटना जुनी आहे. लायब्ररीमधून एका माजी विद्यार्थिनीने हा व्हिडीओ तयार केला होता. व्हिडीओ व्हायरल करणे माझा हेतू नव्हता, असे तिने सांगितले. - व्हिडीओ बनवणारी ही विद्यार्थिनी फक्त अभ्यासासाठी येत होती. तिला बाहेरून ओरडतानाचा आवाज आला आणि त्यानंतर तिने हा व्हिडीओ काढला. तो तिने स्टेटसला ठेवला. दोन-तीन जणांनी तो शेअर केला आणि तो गुरुवारी व्हायरल झाला.  

टॅग्स :thaneठाणेcollegeमहाविद्यालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी