नवी मुंबई - ठाणे वाहतूक आजपासून ४ दिवस बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 07:19 IST2017-12-22T02:37:12+5:302017-12-22T07:19:45+5:30
ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम येणार असल्याने नवी मुंबईकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून नवी मुंबईकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना शुक्रवारपासून २५ डिसेंबरपर्यंतच्या चार दिवसांसाठी ‘नो एण्ट्री’ करण्यात आली आहे.

नवी मुंबई - ठाणे वाहतूक आजपासून ४ दिवस बंद!
ठाणे : ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम येणार असल्याने नवी मुंबईकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून नवी मुंबईकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना शुक्रवारपासून २५ डिसेंबरपर्यंतच्या चार दिवसांसाठी ‘नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. याचदरम्यान,वाहन चालकांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.
यामुळे नवी मुंबईकडून बेलापूर रोडने व ऐरोली पटणी कंपनी मार्गे विटावा-कळवा- ठाण्याचे दिशेने येणाºया सर्व प्रकारच्या वाहनास पटणीकंपनीकडून बेलापूर मिळणा-या ठिकाणी प्रवेश बंद केलाआहे. तर,पर्यायी मार्ग म्हणून बेलापूर -ठाणे रोड या ठिकाणीहून पटणी जंक्शन येथून डावीकडे वळण घेऊन पटणी-ऐरोली रोडने ऐरोली नॉलेज पार्क मार्गे स्वर्गीय सुनील चौगुले चौकातून दिवा कोळीवाडा चौकातून उजवीकडे वळण घेऊन ऐरोली ब्रीज ऐरोली टोल प्लाझा वरून ऐरोली जंक्शन येथून उजवीकडे वळण घेत, पूर्व द्रुतगती महामार्गाने आनंदनगर चेकनाका येथून इच्छित स्थळी जाण्यास सुचवले आहे. या बंदीच्या अधिसुचनेत, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, फायरब्रिगेड, अत्यावश्यक सेवेतील तसेच या पुलाचे कामातील वाहनास लागू राहणार नसल्याचे ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त अमीत काळे यांनी सांगितले आहे.