शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

नवी मुंबईच्या पोस्टमनला चाकुच्या धाकावर तिघांनी ठाण्यात लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 6:37 PM

चाकुच्या धाकावर लुटमार केल्याच्या प्रकरणात नौपाडा पोलिसांनी एका बालगुन्हेगारास बुधवारी ताब्यात घेतले. त्याचे दोन साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देएकाच रात्री तीन गुन्हेबाल गुन्हेगारासह तिघांवर कारवाईएक ताब्यात, दोघांचा शोध

ठाणे : नवी मुंबईच्या एका पोस्टमनला चाकुच्या धाकावर लुटणार्‍या एका बाल गुन्हेगारासह तीन आरोपींविरूद्ध नौपाडा पोलिसांनी बुधवारी गुन्हे दाखल केले. या त्रिकुटाने एकाच रात्री तीन गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.नवी मुुंबईतील तुर्भे येथे राहणारे पोस्टमन सिताराम मलप्पा पुजारी हे मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अंधेरी येथील एक कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने घरी जात होते. कोपरी पुलाजवळील टीएमटी बसथांब्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी तीन तरूणांनी चाकुचा धाक दाखवून त्यांना धमकावले. त्यांची मोटारसायकल, दोन मोबाईल फोन आणि ९ हजार रुपये रोख असा ७६ हजार ५00 रुपयांचा ऐवज घेऊन तिन्ही आरोपी पसार झाले. या प्रकारामुळे हादरलेल्या पुजारी यांनी कसेबसे नौपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत यांनी घटनेचा संदेश तत्काळ वायरलेसवर देऊन यंत्रणेला सतर्क केले. बुधवारी सकाळी नितीन कॅडबरी चौकात नादुरूस्त मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या एका मुलाला पोलिसांनी हटकले. मोटारसायकलला नंबरप्लेट नसल्याने पोलिसांना संशय आला. चौकशी केली असता ती मोटारसायकल तक्रारदार पोस्टमनची असल्याचे समजले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असता, त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे उघडकीस आले. त्याच्यासोबतच्या दोन्ही आरोपींची नावे मिळाली असून, त्यापैकी एक जण कोपरी येथील पारशीवाडीचा तर दुसरा वर्तकनगरचा रहिवासी आहे. ते दोन्ही आरोपी बालगुन्हेगार आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी सतीश राऊत यांनी सांगितले.नवी मुंबईच्या पोस्टमनला चाकुच्या धाकावर लुटल्यानंतर, चोरीच्या मोटारसायकलने आरोपींनी वर्तकनगर आणि राबोडी परिसरात अशाच स्वरूपाचे आणखी दोन गुन्हे केल्याची माहितीही समोर येत आहे. पोस्टमनचे दोन्ही मोबाईल फोन आणि रोकड बाल गुन्हेगारांच्या साथीदारांकडे असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस