शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:09 IST

अश्लील मेसेजद्वारे मुलाला अडकविले; आईचा आरोप

ठाणे : नेव्हल डॉकमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ अभियंता म्हणून काम करणाऱ्या रवी वर्माने भारतातील १४ पाणबुड्या आणि वेगवेगळ्या युद्धनौकांची नावांसह तपशीलवार माहिती व लोकेशन्स दोन पाकिस्तानी गुप्तहेर तरुणींना दिली. याप्रकरणी वर्माला ठाणे न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरम्यान, आपल्या मुलाला अश्लील मेसेज पाठवून यात कोणीतरी त्याला अडकविले असून, तो निर्दोष असल्याचा दावा वर्माच्या आईने शुक्रवारी केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान व दहशतवाद्यांना थेट इशारा दिला होता, भारतीय सैन्यदलाने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानला धडा शिकवला. त्याचवेळी हेरगिरी प्रकरणात हरयाणातील ज्योती मल्होत्रा या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला अटक केली. मल्होत्रा प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र एटीएसने २९ मे २०२५ रोजी संध्याकाळी पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत भारतीय नौदलाची संवेदनशील माहिती पुरविल्याबद्दल रवी वर्माला अटक केली आहे. तो पाकिस्तानच्या पायल शर्मा आणि इस्प्रीत या दोन वेगवेगळ्या नावांनी चालविण्यात येत असलेल्या फेसबुक फ्रेंडच्या संपर्कात होता. याच फेसबुक अकाउंटवर त्याने पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाठवली. नेव्हल डॉकमधील परिसरात मोबाइल नेण्यास बंदी असल्याने तो केवळ या जहाजांची ठिकाणे आणि अन्य माहिती दोघींना पाठवत होता.

२ जनूपर्यंत पोलिस कोठडी 

मुंबई आणि ठाणे एटीएसच्या पथकाने शुक्रवारी चौकशी केल्यानंतर त्याची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. ठाणे न्यायालयाने त्याला २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याने आणखी कोणती माहिती दिली? त्याचे आणखी कोणाशी चॅटिंग झाले? याचा तपास सुरू आहे.

माझा मुलगा निर्दोष 

रवीला कोणीतरी अश्लील मेसेज पाठवून त्याला जाळ्यात ओढले आहे. तो दोषी नसल्याचा दावा कळवा येथे राहणाऱ्या त्याच्या आईने केला. याच कारणाने त्याचे लग्न मोडल्याचे बोलले जाते. आपल्या मुलाच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण भेट घेणार असल्याचे रवीच्या आईने माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानthaneठाणे