राष्ट्रवादी, ओमींना साई पक्षाचा झटका

By Admin | Updated: January 25, 2017 04:50 IST2017-01-25T04:50:50+5:302017-01-25T04:50:50+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि ओमी टीमच्या सदस्या आशा गुप्ता, माजी नगरसेवक प्रभुनाथ गुप्ता यांच्यासह

Nationalist, Omi Sai Party shock | राष्ट्रवादी, ओमींना साई पक्षाचा झटका

राष्ट्रवादी, ओमींना साई पक्षाचा झटका

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि ओमी टीमच्या सदस्या आशा गुप्ता, माजी नगरसेवक प्रभुनाथ गुप्ता यांच्यासह कार्यकर्त्यांनी साई पक्षात प्रवेश केला. गुप्ता यांच्या सोडचिठ्ठीने ओमी टीममध्ये सारे आलबेल नसल्याची प्रतिक्रिया
साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी दिली. सत्तेची चावी पुन्हा साई पक्षाच्या हाती राहण्याचे संकेत त्यांनी दिले.
१९९७ साली प्रभुनाथ गुप्ता पालिकेत निवडून आले. २००२ मध्ये पती-पत्नी, तर २००७ मध्ये पुन्हा ते निवडूण आले. २०१२ साली प्रभाग आरक्षित झाल्याने आशा गुप्ता निवडून आल्या. पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक म्हणून प्रभुनाथ गुप्ता यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी अचानक समर्थकांसह ओमी यांना सोडचिठ्ठी देऊन साई पक्षात प्रवेश केल्याने नवे राजकीय अंदाज बांधणे सुरू झाले.
साई पक्षाच्या नेत्यांनी या प्रवेशाचे स्वागत केले आहे. उल्हासनगरमधील सत्तेच्या चाव्या आमच्या हाती राहण्याच्या व्यूहरचनेची ही सुरूवात आहे. आणखी काही जण फुटून आमच्या पक्षात येतील, असा दावा इदनानी यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Nationalist, Omi Sai Party shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.