शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने घातले नोटाबंदीचे श्राद्ध, भाजपच्या नीतीविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:08 IST

ठाणे - मोदी सरकारने नोटाबंदी करुन १ वर्षाचा कालावधी सरला आहे. मात्र, या एका वर्षानंतरही भारतीय अर्थव्यवस्था कोमातून बाहेर आलेली नाही, असा आरोप करीत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली रा ष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीचे विधिवत श्राद्ध घातले. ...

ठळक मुद्देआंदोलनानंतर गरीब लहान मुलांना घातले जेवणभाजपा सरकारच्या विरोधात पिंडदानभाजपच्या नितिविरोधात आंदोलन तीव्र होणार

ठाणे - मोदी सरकारने नोटाबंदी करुन १ वर्षाचा कालावधी सरला आहे. मात्र, या एका वर्षानंतरही भारतीय अर्थव्यवस्था कोमातून बाहेर आलेली नाही, असा आरोप करीत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीचे विधिवत श्राद्ध घातले. दरम्यान, नोटाबंदीमुळे या देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून त्याविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस आपला लढा अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी आनंद परांजपे यांनी दिला.मागील वर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक १ हजार आणि ५०० रु पयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून या देशातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून ती एक वर्षानंतरही सावरलेली नाही. त्याच निषेधार्थ तसेच नोटाबंदीच्या या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी होळकर घाटावर नोटाबंदीचे वर्षश्राद्ध ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घालण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक प्रकाश बर्डे, सुहास देसाई, राजन किणी, शानू पठाण, वहिदा खान, अनिता शिंदे, आरती गायकवाड, अपर्णा साळवी, मोरेश्वर किणी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मंदार किणे, राष्ट्रवादीचे विद्यार्थी अध्यक्ष अभिजीत पवार, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा करिना दयालानी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत मुंडणही केले.यावेळी परांजपे म्हणाले की, मागील वर्षी मोदी सरकारने भारतीय जनतेवर नोटाबंदी लादली होती. तेव्हापासून या देशात आर्थिक अराजकता माजली आहे. या नोटा बदलण्याच्या रांगेत उभे राहणारे शंभरपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. नवीन रोजगार निर्मिती ठप्प झालेली असतानाच १५ लाख जणांच्या नोकºया गेल्या आहेत. देशाचा विकासदर ७.१ वरु न ५.७ घसरला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असणाºया मोदी यांच्या हुकूमशाही धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रखर लढा उभारणार आहे.चौकटआंदोलनानंतर दिसली मानवतानोटाबंदीचे वर्षश्राद्ध घातल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अन्नदान केले. ब्राम्हणाच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात पिंडदान करण्यात आले. त्यानंतर या परिसरात असणाऱ्या गरीब आणि लहान बालकांना अन्नदान करण्यात आले. सुमारे ५० जणांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेवण दिले. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसtmcठाणे महापालिका