शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने घातले भाजप सरकारचे चौथे वर्षश्राध्द, कार्यकर्त्यांनी केले मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 14:44 IST

ठाणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. यावेळी सरकारचे श्राध्द घालत, कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये सरकार बुडविण्याचा केला निर्धार१२ कोटी जनता धडा शिकवेल

ठाणे - भाजप सरकारच्या कारकीर्दीला चार वर्षे झाली आहेत. या चार वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे, बेरोजगारी, महिलांवरी अत्याचार, सामाजिक तेढ, राज्याची खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे महाराष्ट्र असुरिक्षत, अशांत, असह्य आणि अर्थशून्य झाला आहे. असा आरोप करीत ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यात भाजप सरकारचे चौथे वर्षश्राद्ध घालण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करुन फडणवीस सरकारचा निषेध केला.                 फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करु न चार वर्षे झाली आहेत. आज महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘ नही नरेंद्र.. नही देवेंद्र; ये सरकार है ठगेंद्र’, एवढी माणसे कशाला? सरकारच्या श्राद्धाला, भारत मे शोर हैइ चौकीदार चोर है... फ्रान्स मे शोर है भाजप सरकार चोर है, अशा घोषणा देत मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी विसर्जन घाटावर सरकारचे विधीवत श्राद्ध घातले. यावेळी पिंडदान देखील करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांनी मुंडण करुन २०१९ मध्ये सरकार बुडवण्याचा निर्धार केला.यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये महिलांशी संबधीत गुन्हयांचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. येथील माय भगिनींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. नागपूरमध्येच गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. मुंबईसारख्या शहरात मंगळवारीच एकाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील जनता असुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. दलित- सवर्ण, ओबीसी- मराठा अशी सामाजिक तेढ या सरकारने निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतमालाला हमीभाव दिला जात नाही. परिणामी, शेतकरी पुन्हा आत्महत्या करीत आहेत. पदवीधर तरु णांना रोजगार मिळेनासा झाला आहे. राज्य दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्योगांवर संकट घोंघावत आहे. या सर्व प्रकाराला फडणवीस सरकारच जबाबदार आहे, महाराष्ट्राची वाटचाल विकासाऐवजी विनाशाकडे होत आहे, असा आरोप करुन आगामी वर्षात या सरकारला महाराष्ट्रातील १२ कोटी जनता बुडवून टाकेल, असा आशावाद व्यक्त केला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा