राष्ट्रीय खेळाडूचा विनयभंग : प्रशिक्षकाला अटक
By Admin | Updated: July 30, 2015 00:36 IST2015-07-30T00:36:12+5:302015-07-30T00:36:12+5:30
डोंबिवलीतील भोईर जिमखान्यात एका जिम्नॅस्टिक खेळाडूचा प्रशिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राष्ट्रीय खेळाडूचा विनयभंग : प्रशिक्षकाला अटक
कल्याण : डोंबिवलीतील भोईर जिमखान्यात एका जिम्नॅस्टिक खेळाडूचा प्रशिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नंदकिशोर बाळकृष्ण तावडे असे या प्रशिक्षकाचे नाव असून त्यास विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तरुणी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. २०१२ ते २०१५ या कालावधीत जिमखाना येथे जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेत असताना तावडे याने वारंवार लगट करीत विनयभंग केल्याची तक्रार तरुणीने पोलीस ठाण्यात के ली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तावडेला अटक केली असून बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खाजगी शिकवणीला येणाऱ्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच अल्पवयीन खेळाडूच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. (प्रतिनिधी)