शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय गणित दिन विशेष, गणिताची भीती घालवू पाहणारा गणितमित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:18 IST

संडे अँकर । सोनावणेंची धडपड। विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठीही कार्यशाळा

स्नेहा पावसकर 

ठाणे : गणिताचा अभ्यास म्हटला की विद्यार्थीच नाही तर पालकांच्या मनातही विनाकारण भीती निर्माण होते. पण केवळ शालेय अभ्यासक्रमातच नाही तर अगदी दैनंदिन जीवनातही व्यवहारात उपयोगी पडते ते गणित. या गणिताबद्दल विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनातीलही भीती घालवण्यासाठी आणि शिक्षकांनाही गणित अध्यापन अधिक सोपे वाटावे या उद्देशाने गणितमित्र संतोष सोनावणे विविध कार्यशाळांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करत आहेत.

काहींना संपूर्ण गुण मिळवून देणारा तर काही मुलांना नापासाचा शेरा मिळवून देणारा विषय म्हणजे गणित. या गणित विषयाबद्दल प्राथमिक वर्गातच मुलांच्या मनात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संतोष यांनी काम करण्याचे ठरवले. सर्वेक्षणाचा आधार घेत त्यांनी मुलांना कठीण वाटणाऱ्या संकल्पना जाणून त्या सोप्या करून सांगितल्या.विद्यार्थ्यांचा गणिताचा अभ्यास घेताना काहीशी टाळाटाळ करणाºया पालकांमध्येही गणित विषयाबद्दल रूची निर्माण केली. विद्यार्थी आणि पालकांसाठी गेल्या ३-४ वर्षात संतोष यांनी अनेक मोफत कार्यशाळा घेतलेल्या आहेत.गणित शिक्षण आनंददायी वाटावे यासाठी गणित समजून घेताना... या विषयावर त्यांनी ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील शिक्षकांसाठी १०० हून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. त्याद्वारे ते गणितामधील रितीची समज, संबोध, संकल्पना, तर्काची समज विकसित करणारी रंजक पद्धती प्रत्यक्ष खेळाद्वारे मांडतात. भागाकार संकल्पनेवर आधारीत प्रशिक्षण संच व शिक्षक हस्तपुस्तिका त्यांनी तयार केली आहे. तसेच ‘अपूर्णांकाचा पूर्ण अभ्यास’ या पुस्तकातून शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.संतोष हे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक असून सध्या प्रतिनियुक्तीवर प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई येथे गणित विषय सहायक म्हणून काम पाहत आहेत.गणित हा विषय यांत्रिक पद्धतीने आणि परीक्षेत गुण मिळवण्याच्या उद्देशानेच अनेकजण शिकतात. पण मुलांना त्यात आवड निर्माण होणे गरजेचे आहे. कारण जे आपल्याला आवडते ते आपण आनंदाने आणि समजून घेत शिकतो. त्यामुळे गणित विषय प्रत्यक्ष कृतीतून, आनंदाने आणि शिकण्याच्या नैसर्गिक शास्त्राने शिकावा यासाठी मी विविध उपक्रम राबवत आहे, असे संतोष सोनावणे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका