शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक- मुंबई महामार्गावर आपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर 2 जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 13:38 IST

Kasara : ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे ट्रकवरील ताबा सुटला आणि महामार्गावरून कल्याणकडे जात असलेल्या दुचाकीला धडक दिली.

- श्याम धुमाळ

कसारा : नाशिक-मुंबई महामार्गावरील वेहलोलीजवळ ट्रक व दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर 2 जण जखमी झाले आहेत. महामार्गावर मुंबईच्या दिशेने ट्रक (MH 04 CY4304)भरधाव वेगाने जात असताना वासिंद येथील वेहलोली गावाजवळ हा अपघात झाला. 

ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे ट्रकवरील ताबा सुटला आणि महामार्गावरून कल्याणकडे जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार पप्पू दशरथ भोईर (वय  22 , रा. वेळूक, कसारा) हा जागीच ठार झाला तर त्याच्या सोबतचा सहकारी गंभीर जखमी झाला. याचबरोबर, दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक काही अंतरावर जाऊन महामार्गालगतच्या खड्ड्यात पलटी झाला. त्यात ट्रकमधील साहित्या खाली दबून ट्रक चालक विलास पाटील (रा. जळगाव) हा जागीच ठार झाला. तर ट्रकमधील आणखी एकजण जखमी झाला. 

दरम्यान, या अपघातची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले. जमखींना शहापूर उपजिल्हा रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद व शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात