शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

टेंम्पोसह कापड चोरी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By नितीन पंडित | Updated: November 15, 2022 19:46 IST

टेम्पोसह कापड चोरी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात नारपोली पोलिसांना यश आले आहे.   

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच टेम्पोमध्ये ११ लाख ८८ हजार ११४ रुपयांचे कापडाचे रोल घेऊन टेम्पो चालक जात असताना दापोडारोड, वळगांव या ठिकाणी चहा नाष्टासाठी थांबला असता अज्ञात चोरट्याने टेम्पो मालासह घेऊन फरार झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार, सहा.पोलीस उप निरीक्षक डी.डी.पाटील, बी एस नवले, पोलीस कर्मचारी बी बी चव्हाण, हरेश म्हात्रे, लक्ष्मण सहारे, सुनिल शिंदे, योगेश क्षिरसागर, मयुर शिरसाट, विजय ताठे या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे माग काढून अवघ्या २४ तासात अमरदीप चंद्रकांत जयस्वाल, वय ३५, रा.कल्याण व जुबेर अहमद मजिदअली खान,वय ३५,रा.वडाळा मुंबई अशा दोघा आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ९ लाख ४९ हजार १६७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नारपोली पोलिसांनी दाखल गंभीर गुन्ह्यात अवघ्या २४ तासात आरोपींच्या मुसक्या आवळून मुद्देमाल हस्तगत केल्याची महिना नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी मंगळवारी दिली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटक