शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

आयरे प्रभागातील ‘ते’ भोगताहेत नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 05:48 IST

गलिच्छ आणि मोडकी शौचालये : स्वच्छता अभियानाला केडीएमसीने फासला हरताळ

डोंबिवली : स्वच्छता अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पूर्वेकडील आयरेगाव प्रभागातील सहकार आणि समतानगरमध्ये काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेल्या शौचालयांची पुरती दयनीय अवस्था झाली आहे. मोडके दरवाजे, स्वच्छतेअभावी दुर्गंधी, किडेअळ्यांचे साम्राज्य याठिकाणी पाहावयास मिळत आहे. पायवाटांचीही दुरवस्था झाली असून पिण्याच्या पाण्याची बोंब असताना शौचालय स्वच्छतेकरिता कुठून पाणी मिळणार, अशी परिस्थिती असल्याने रहिवासी अक्षरश: नरकयातना भोगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, हगणदारीमुक्त शहरांचा नारा दिला. प्रत्यक्षात कल्याण-डोंबिवली शहरे हगणदारीमुक्त झाली का, असा सवाल रिपाइंचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. शहरांमध्ये स्वच्छता अभियानाचा देखावा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे वास्तव आयरेगाव प्रभागातील सहकारनगर आणि समतानगरमध्ये पाहावयास मिळत आहे. येथील लोकवस्ती हजारोंच्या आसपास असून २०००-२००५ मध्ये तत्कालीन नगरसेवक काळू भगत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, दुरुस्ती करण्यात आलेल्या शौचालयांचे ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत सहा महिन्यांपूर्वी पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत त्यांची पुरती दुरवस्था झाली असून यानिमित्ताने निकृष्ट बांधकामांचा नमुना पाहावयास मिळत आहे. शौचालयांची दैनंदिन स्वच्छता होत नसल्याने लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर साठणाऱ्या मैल्यामुळे किडे आणि अळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. सफाई कामगार कित्येक दिवसांपासून फिरकले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. शौचालयांना आलेली अवकळा पाहता नैसर्गिक विधिकरिता बाजूकडील रेल्वे ट्रॅकचाच आधार घ्यावा लागत असल्याचे लोकांनी सांगितले. अशावेळी अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. यासंदर्भात मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता बबन बरफ तसेच स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.कमी दाबामुळे पाणीही मिळेनाच्केडीएमसीच्या क्षेत्रात पाणीकपात लागू झाल्याने मंगळवारी पाणीपुरवठा बंद असतो. परंतु, अन्य दिवशीही कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिक महिला रहिवासी शाहीन पटेल यांनी सांगितले.च्स्वतंत्र जलवाहिनी असूनही पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब कायम असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, पायवाटा नादुरुस्त झाल्याने चालणेही जिकिरीचे बनल्याचे अन्य रहिवाशांकडून सांगण्यात आले. परिसरातील पथदिवेही बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले....तर आंदोलनाशिवाय पर्याय नाहीस्वच्छता अभियानाच्या नावाखाली जी शौचालयांची कामे केली आहेत, ती एक प्रकारे धूळफेक असून राजा सुस्त आणि प्रजा त्रस्त, असे काहीसे चित्र या दोन्ही वस्त्यांची पाहता येते, असे मत आरपीआय आठवले गटाचे लालसाहब जमादार यांनी व्यक्त केले. वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. यापुढे परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जमादार यांनी दिला. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे