शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आयोजित कथा स्पर्धेत शीला हिरुरकर तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:30 PM

मराठी ग्रंथ संग्रहालय , ठाणे आयोजित कथा - काव्य स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून त्यांनी लिहिलेल्या कथा - काव्य मागविण्यात आले होते. रविवारी उत्कृष्ट कथा - काव्याना पारितोषिक देण्यात आले.

ठळक मुद्देकथा स्पर्धेत शीला हिरुरकर तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे प्रथमस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते कथा स्पर्धेत ६८ स्पर्धक, तर काव्य स्पर्धेत १०० स्पर्धक सहभागी

ठाणे: मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेच्या रौप्य महोत्सवी वषार्निमित्ताने संस्थेच्यावतीने कथा-काव्य कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी कथा स्पर्धेत शीला हिरुरकर यांच्या ‘गिफ्ट’ या कथेला तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे यांच्या ‘कोण म्हणतो’ या कवितेने प्रथम क्रमांक पटकाविला.           या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी संस्थेच्या सभागृहात पार पडला. ९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी यावेळी डॉ. अनंत देशमुख, दा.कृ. सोमण, संजीव ब्रह्मे, विद्याधर ठाणेकर, विद्याधर वालावलकर आदी उपस्थित होते. कथा स्पर्धेत ६८ स्पर्धकांनी भाग घेतला होता तर काव्य स्पर्धेत १०० स्पर्धकांनी २८३ कविता पाठविण्यात आल्या होत्या. कथा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक वसुंधरा घाणेकर यांच्या मॅग्निफाइंग ग्लास या कथेला मिळाले. तृतीय पारितोषिक स्वाती पाटील यांच्या ‘एक कप चहा’ व ऋषीकेश वांगीकर यांच्या ‘सोयरीक’ या कथांना विभागून देण्यात आले. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक जयंत घेगडमल यांच्या ‘एका मयताची गोष्ट’, उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक मनीषा पोतनीस यांच्या ‘टर्निंग पॉईंट’ तर उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक शिरीष नाडकर्णी यांच्या ‘परिवर्तन’ या कथेला प्राप्त झाले. या स्पर्धेचे परिक्षण माधवी घारपुरे, शशिकांत कोनकर व अरविंद दोडे यांनी केले. कविता स्पर्धेत द्वितीय पारितोषिक संजीव फडके यांच्या ‘मंदिर आणि कुटी’ तर तृतीय पारितोषिक विलास वेखंडे यांच्या ‘वणवा’ या कवितांना मिळाले. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक वैशाली फाटक - काटकर यांच्या ‘एक प्रश्न’ तर उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक रविंद्र सोनावणी यांच्या ‘निसर्ग कविता’ या कवितांना पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचे परिक्षण अरुण म्हात्रे, अनुपमा उजगरे, वृषाली कांबळे, सतीश सोळांकुरकर यांनी केले. या परिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन चांगदेव काळे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकliteratureसाहित्य