खड्ड्यांना महापौर, उपमहापौरांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:02 AM2018-07-20T02:02:59+5:302018-07-20T02:03:42+5:30

शिवसेनेने मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना महापौर, उपमहापौर, सभापती, गटनेत्यांची नावे देऊन निषेध केला.

The names of mayors, deputy mayor of potholes | खड्ड्यांना महापौर, उपमहापौरांची नावे

खड्ड्यांना महापौर, उपमहापौरांची नावे

मीरा रोड : मीरा-भार्इंदर पालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे शहरातील एकही रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित राहिलेला नसून खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने गुरुवारी मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना महापौर, उपमहापौर, सभापती, गटनेत्यांची नावे देऊन निषेध केला.
सकाळी भार्इंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट येथील क्र ीडासंकुलाबाहेरच्या मुख्य रस्त्यावर शिवसेनेने खड्ड्यांचे नामकरण केले. खड्ड्यांना महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, प्रभाग समिती सभापती अरविंद शेट्टी, मदन सिंह, रीटा शाह, दिनेश जैन, परशुराम म्हात्रे, डॉ. सुशील अग्रवाल, गटनेते हसमुख गेहलोत यांच्या नावांचे फलक लावले होते.
विरोधी पक्षनेते राजू भोईर, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला उपजिल्हासंघटक स्नेहल सावंत, नगरसेवक प्रवीण पाटील, नीलम ढवण, अनिता पाटील, स्नेहा पांडे, धनेश पाटील, कमलेश भोईर, जयंती पाटील, माजी नगरसेवक शरद पाटील, लक्ष्मण जंगम, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, धनेश पाटील, प्रकाश मांजरेकर, शहर संघटक सुप्रिया घोसाळकर, विजय वाळंज, सुभाष केरकर, शिवशंकर तिवारी, विकास पाटील, नीशा नार्वेकर आदी सहभागी झाले होते.
भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे शहर खड्डेमय झाले आहे. फक्त स्वत:चा अर्थपूर्ण विकास साधण्यातच भाजपा नेते मग्न असून त्यांना व पालिकेला रस्त्यांची झालेली चाळण दिसत नाही.

भाजपावर ओढले आसूड
सत्ताधाऱ्यांना नागरिकांनी आता खड्ड्यांत टाकले नाही, तर संपूर्ण शहरच काय राज्य व देशही भाजपा खड्ड्यांत घालेल, अशी टीका शिवसेनेने केली. याआधी शिवसेनेने मीरा रोडच्या हटकेश भागातील मुख्य रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले. एकूण राजकारण तापले आहे.

Web Title: The names of mayors, deputy mayor of potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.