रस्त्याचे नामकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:36 IST2021-03-14T04:36:07+5:302021-03-14T04:36:07+5:30

उल्हासनगर : कॅम्प नं. ४ येथील सुभाष टेकडी परिसरातील विविध रस्त्यांचे नामकरण करण्याची मागणी नगरसेविका कविता बागुल व समाजसेवक ...

Name the road | रस्त्याचे नामकरण करा

रस्त्याचे नामकरण करा

उल्हासनगर : कॅम्प नं. ४ येथील सुभाष टेकडी परिसरातील विविध रस्त्यांचे नामकरण करण्याची मागणी नगरसेविका कविता बागुल व समाजसेवक सुधीर बागुल यांनी आयुक्तांकडे केली आहे. नामकरण रस्त्यांची यादी आयुक्तांना दिलेल्या निवेदनासोबत जोडली आहे.

-------------------------

नाले दुरुस्तीची मागणी

उल्हासनगर : कॅम्प नं. ४ परिसरातील साने गुरुजी नगर येथील रस्ता व दोन्ही बाजूच्या नाल्यांच्या दुरुस्तीची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच दहाचाळ ते अयप्पा मंदिर कमानी दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करावी, असेही निवेदनात सुचविले आहे. वेळीच रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा गोडसे यांनी दिला आहे.

---------------------------

घाणीचे साम्राज्य

उल्हासनगर : महापालिका प्रभाग क्र. ७ हा घाणीचे साम्राज्य असलेला प्रभाग म्हणून जाहीर करण्याची मागणी मनसेचे पदाधिकारी प्रा. प्रवीण माळवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. रस्त्याची दुरवस्था, पाणी गळती, कचऱ्याचे ढीग, बेकायदा बांधकामे, साफसफाईची वानवा प्रभागात निर्माण झाल्याचा आरोप माळवे यांनी केला आहे.

Web Title: Name the road