शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पुर्नविकासाच्या नावाखाली महिलेस फसवणाऱ्या बिल्डर विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 11:31 IST

२००० साली दहिसरला राहणारा अनंत जाधव या बिल्डरने आम्रपाली डेव्हलपर्स या नावाखाली जयश्री यांची आजी, आई व दोन भावांसोबत जुनं घर पाडून इमारत बांधण्याचा करार केला

मीरारोड - जुनं घर मोडून त्या ठिकाणी इमारत बांधून मुळ मालकासच दिलेली सदनिका परस्पर दुसऱ्याला विकणाऱ्या बिल्डरवर अखेर ठाणे न्यायालयाच्या आदेशाने भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदर पुर्वेच्या गोडदेव गावातील साई नेत्रा इमारतीत राहणाऱ्या जयश्री विश्वनाथ पाटील (५५) यांच्या पतीचे सुमारे २५ वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांनी घरकाम व लोकांची धूणीभांडी करुन घर संसार चालवला. सद्या त्या अकरा वर्षाच्या नातवा सोबत राहतात. साई नेत्रा इमारतीच्या जागी जयश्री यांच्या आजोबांचे जुने कौलारु घर आणि जमीन होती. आजोबांच्या मृत्युनंतर सदर जमीन व त्यावरील घर हे आजी आणि वडिलांच्या नावे झाले.२००० साली दहिसरला राहणारा अनंत जाधव या बिल्डरने आम्रपाली डेव्हलपर्स या नावाखाली जयश्री यांची आजी, आई व दोन भावांसोबत जुनं घर पाडून इमारत बांधण्याचा करार केला. जयश्री देखील वारस असल्याने बिल्डर जाधव याने त्यांना देखील इमारतीत सदनिका देण्याचे आश्वासन देऊन इमारत बांधून झाल्यावर त्यात सदनिका दिली.जयश्री यांनी बिल्डरकडे सदनिका दिल्याचा करारनामा व आवश्यक कागदपत्रे मागितली असता बिल्डरने सदनिका तुमच्यातच ताब्यात आहे असे सांगून कागदपत्रे कशाला हवीत म्हणत टोलवाटोलवी चालवली. जयश्री देखील मुळ जमीन - घर आपलंच असल्याने बिल्डरवर विश्वास ठेऊन सदनिकेत सुमारे १३ वर्षांपासून रहात होत्या. मात्र एप्रिल २०१८ मध्ये युनियन बँकेचे कर्मचारी जयश्री यांच्या घरी आले आणि त्यांनी सदर सदनिका चंद्रभान गुप्ता याच्या नावे असून त्याने बँकेकडून १२ लाखांचे कर्ज घेतले आहे. त्याचा एकही हप्ता भरलेला नाही म्हणुन जप्तीची नोटीस बजावली. या घटनेने हादरलेल्या जयश्री यांनी नोटीसवर मुदत मिळवत दुसरीकडे ठाणे न्यायालयात बिल्डर जाधव विरोधात दावा दाखल केला. न्यायालयाने बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर जयश्री यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी पोलीसांनी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस