शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

महामुंबईसह नैनाच्या विकासाला मिळेल चालना, प्रवास होणार सुकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 8:21 AM

आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. येत्या काळात नवी मुंबई सेझच्या जमिनीवर राज्य शासनाने वापरात बदल करून औद्योगिकसह वाणिज्यिक आणि निवासी बांधकामांना परवानगी दिली आहे. सुमारे १८४० हेक्टर जमिनीवर हा सेझ आहे.

ठाणे : सध्या एमएमआरडीए क्षेत्रात सर्वांत जास्त विकास पनवेल-कर्जत-खालापूर क्षेत्रात होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना क्षेत्रात या परिसराचा समावेश झाल्याने भविष्यात या परिसराच्या विकासासाठी हा उपनगरीय मार्ग गरजेचा आहे. भविष्याची ही चाहूल ओळखूनच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पनवेल-कर्जतदरम्यान नवा उपनगरीय मार्ग प्रस्तावित केला आहे.आताच या परिसरात मोठमोठ्या टाउनशिप उभ्या राहत आहेत. येत्या काळात नवी मुंबई सेझच्या जमिनीवर राज्य शासनाने वापरात बदल करून औद्योगिकसह वाणिज्यिक आणि निवासी बांधकामांना परवानगी दिली आहे. सुमारे १८४० हेक्टर जमिनीवर हा सेझ आहे.नेरूळ-बेलापूर-उरण मार्गावर खारकोपरपर्यंत लोकल वाहतूक सुरू झाली आहे. जेएनपीटीच्या विस्ताराचे काम जोमाने सुरू आहे. पुढे उरण-पनवेल-कर्जत मार्ग जोडण्यात येणार आहे. शिवाय, नैना क्षेत्रातील २३ गावांच्या टीपी प्लानला राज्याच्या नगरविकास खात्याने पहिल्या टप्प्यात परवानगी दिली असून, तेथे मोठमोठ्या विकासकामांची बांधकामे जोरात सुरू आहेत. त्यातच, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा विस्तार, विरार-अलिबाग कॉरिडोर आणि जेएनपीटी ते दिल्ली डेडिकेट फ्रंट्रिअर कॉरिडोरमुळे या परिसरात येत्या काळात उद्योगांसह मानवी वस्ती वाढणार आहे. यामुळे या मार्गाचे दुपदरीकरण होणे खूपच गरजेचे आहे. प्रवास होणार सुकर - सध्या अंबरनाथ-बदलापूरसह कर्जतच्या प्रवाशांना रेल्वेमार्गे नवी मुंबईला यायचे झाल्यास त्यांना कल्याण-दिवा-ठाणे मार्गाशिवाय पर्याय नाही. यात त्यांचा वेळ, श्रम, पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र, कर्जतहून थेट पनवेलपर्यंत उपनगरीय सेवा सुरू झाल्यास त्यांना पनवेलमार्गे थेट नवी मुंबईसह उरण-जेएनपीटीत जाणे-येणे सोपे होणार आहे. नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील विविध कंपन्या, वाशी, बेलापूर स्थानके आणि महापेतील आयटी पार्कसह मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ये-जा करण्याचा कल्याण-ठाणेमार्गे होणारा द्राविडीप्राणायाम कमी होणार आहे.सिडकोवर टाकणार भारपनवेल-कर्जत मार्गाचा सिडकोसही फायदा होणार असल्याने त्याचा ५० टक्के खर्च अर्थात ६९५.७५ कोटी रुपये सिडकोस देण्यास सांगण्यात आले आहे. कारण, हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर नैना क्षेत्रातील सिडकोच्या मालमत्तांच्या किमती वाढणार आहेत.निधी उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएवरपनवेल-कर्जत मार्गासह एमयूटीपी-३ अंतर्गत सर्व प्रकल्पांसाठी लागणारा निधी उभारून तो रेल्वे विकास महामंडळास देण्याची जबाबदारी शासनाने एमएमआरडीएवर सोपवली आहे. यात जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यात येणार आहे. यामुळे महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक विकासाला चालना मिळेल, असा आशावाद आहे.

टॅग्स :localलोकलcidcoसिडकोIndian Railwayभारतीय रेल्वेthaneठाणे