शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमधील शुक्राचार्यांनी रोखली नाईक-नड्डा भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:39 IST

भाजपचे ठाणे जिल्ह्यातील नेते आणि यापूर्वी नाईक यांच्या नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले नेते एकवटले आहेत.

अजित मांडके ठाणे : माजी मंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात भाजपचे ठाणे जिल्ह्यातील नेते आणि यापूर्वी नाईक यांच्या नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले नेते एकवटले आहेत. नाईक यांना व्यासपीठावर खुर्ची न देण्याची घटना घडण्यापूर्वी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नाईक यांच्याशी होणारी भेट याच कंपूने टाळली, तर गडकरी रंगायतनच्या व्हीआयपी रूममध्येही ही भेट होणार नाही, याचा चोख बंदोबस्त केला गेला, अशी माहिती आता उजेडात आली आहे.ठाणे जिल्ह्यात भाजपकडे एकही सक्षम नेता नसल्याने भविष्यात नाईक यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व दिले गेले, तर आपली पंचाईत होईल, या कल्पनेने भाजपमधील जुनी मंडळी आणि २०१४ पूर्वी किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेली मंडळी एकत्र आली आहेत. वस्तुत: आतापर्यंत संघ परिवाराच्या मुशीत वाढलेली जुनी भाजपची मंडळी आणि राष्ट्रवादीतून आलेल्यांमधून विस्तव जात नव्हता. मात्र, नाईक यांचा साऱ्यांनीच धसका घेतला आहे.नाईक आणि नड्डा यांची एका हॉटेलमध्ये भेट ठरली होती. त्यासाठी येथील एक स्युट बुक केला होता. मात्र, भाजपमधील स्थानिक मंडळींनी ही भेट होऊ नये, यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. यापूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या पण वेगळी चूल मांडणाºया मंडळींनी एकत्र येऊन हे कारस्थान घडवल्याचे सूत्रांनी सांगितले. नाईक आणि नड्डा यांची कार्यक्रमापूर्वी ज्या हॉटेलमध्ये भेट होणार होती, त्याच्याबाहेर पोलीस बंदोबस्त होता. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सभेची वेळ होईपर्यंत नड्डा यांना ठाण्यातील भेटीगाठींमध्ये व्यस्त ठेवले. परिणामी, नाईकांना नड्डा यांना भेटता आले नाही. आता उशीर झाल्याने गडकरी रंगायतनच्या व्हीआयपी रूममध्ये ही भेट होईल, असे सांगितले गेले. मात्र, ज्या व्हीआयपी रूममध्ये ही भेट होणार होती, त्याठिकाणी आधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याने तेथेही भेट होऊ शकली नाही. व्यासपीठावर बसायला खुर्ची नसल्याचे लक्षात आल्यावर हेतुत: हे घडवण्यात आल्याचे नाईक यांच्या लक्षात आल्याने त्यांनी काढता पाय घेतला.>जिल्हा नेतृत्वासाठी निष्ठावंतांची एकजूटनाईक भाजपमध्ये डेरेदाखल झाल्याचा धसका भाजपमधील मूळ नेते आणि काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून पक्षात दाखल झालेल्या मंडळींनी घेतला आहे. नाईक यांना जिल्हा नेतृत्वाचा अनुभव असून त्यांची जिल्ह्यावरील पकड मजबूत आहे. शिवाय, नाईक हे आर्थिकदृष्ट्या तगडे नेते आहेत.त्यामुळे भविष्यात जिल्हा नेतृत्वाची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे दिली, तर आपले अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी भीती या मंडळींना वाटत आहे. यामुळे जिल्हा नेतृत्व हे आपल्यापैकीच कोणाला तरी मिळावे, पण ते नाईक यांच्याकडे जाऊ नये, यासाठी आपापसांतील मतभेद विसरून सारेच एकत्र आले आहेत.यापूर्वी भाजपमधील ज्या मंडळींचे एकमेकांशी पटत नव्हते, ज्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही, असे सर्वजण नाईकांना रोखण्यासाठी एकत्र आल्याची माहिती सूत्रांनी दिली.>नाईकांच्या भाजपप्रवेशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांजवळ एका मोठ्या उद्योगपतीने प्रयत्न केल्याची चर्चा आहे. नाईकांचा प्रवेश भाजपला ठाणे जिल्ह्यात कशी संजीवनी देऊ शकेल, हे पटल्याने त्यांचा प्रवेश झाला आहे. मात्र, नाईक यांना भाजपमधील स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचाही नाईक यांना विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या प्रवेशावेळी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळलेली असतानाही नाईकांविरोधात केलेल्या या कारस्थानाची आता पक्ष कशी दखल घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ganesh Naikगणेश नाईक