'माझा रस्ता माझी जबाबदारी'; श्रमजीवी कार्यकर्त्यांनी श्रमदानाने भरले महामार्गावरील खड्डे  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 07:01 PM2020-11-04T19:01:00+5:302020-11-04T19:01:42+5:30

गेल्या वर्षी डॉ.नेहा शेख या तरुणीचा या महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्यावर तरुणांनी आंदोलन करीत या रस्त्यावरील कवाड येथील टोल नाका बंद केला

‘My way is my responsibility’; The potholes on the highway were filled with labor by the working class workers | 'माझा रस्ता माझी जबाबदारी'; श्रमजीवी कार्यकर्त्यांनी श्रमदानाने भरले महामार्गावरील खड्डे  

'माझा रस्ता माझी जबाबदारी'; श्रमजीवी कार्यकर्त्यांनी श्रमदानाने भरले महामार्गावरील खड्डे  

Next

भिवंडी - श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवक प्रमुख यांनी सोशल मीडियावर आवाहन करून क्रांतिकारक स्व.वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मदिनी स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन बुधवारी "माझा रस्ता माझी जबाबदारी"हा उपक्रम राबवून हे खड्डे बुजविण्याचे केलेले आवाहन यशस्वी झाले आहे . भिवंडी तालुक्यातील तरुणांनी व श्रमजीवींच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन स्वतः रस्त्यावर उतरून भिवंडी-वाडा, मनोर महामार्गावरील खड्डे श्रमदानाने भरून नवा आदर्श निर्माण करून पुढारी, नेते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला चांगलीच चपराक लगावली असल्याचे बोलले जाते.

भिवंडी वाडा महामार्ग हा रस्ता सुरुवातीपासूनच काही ना काही कारणांमुळे वादातच राहिला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या रस्त्यावर सुरुवातीपासूनच खड्डे पडले असून रस्त्याची जबाबदारी असलेल्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे या महामार्गाकडे पुरता दुर्लक्ष असल्याने संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या जीवघेण्या खडयांमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप जीव मृत्युमुखी पडले आहेत, तर हजारो नागरिक वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन या धोकादायक महामार्गावरून रोज प्रवास करीत आहेत.या महामार्गाच्या विरोधात यापूर्वीही श्रमजीवी संघटना आणि स्थानिक तरुणांनी अनेक आंदोलने केली आहेत .
          
गेल्या वर्षी डॉ.नेहा शेख या तरुणीचा या महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्यावर तरुणांनी आंदोलन करीत या रस्त्यावरील कवाड येथील टोल नाका बंद केला परंतु आजपर्यंतही परिस्थिती बदलली नसून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि येथील लोकप्रतिनिधीनी याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले असल्याने श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवा प्रमुख प्रमोद पवार यांनी आणि संपूर्ण महामार्गावरील स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन बुधवारी युवा क्रांतिकारक स्व. वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मदिवशी या महामार्गावरील आपल्या आपल्या गावाशेजारील रस्ता "माझा रस्ता माझी जबाबदारी" अश्या प्रकारचे आगळेवेगळे धोरण ठरवून श्रमदान करून या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. आज डाकीवली पुलापासून थेट महापोली गावापर्यंत मालबिडी, महापोली, अंबाडी नाका, पालखाने, वारेट, रेवदी, धोंडवडली दुगाड, इत्यादी भागातील तरुणांनी या भागात साहित्य जमा करून स्वतः कुदळ फावडे हातात घेऊन खड्डे भरले. 
           
यावेळी श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, भूषण घोडविंदे, असगर पटेल, आर्यन ग्रुपचे कल्पेश (बाळू) जाधव, पालखने माजी सरपंच रमाकांत पाटील,रुपेश जाधव, भुषण जाधव, अकलोली भागातील श्रमजीवी कार्यकर्ते जयेश पाटील, नारायण जोशी, नवनाथ भोये, तसेच महेश ठाकरे, नईम शेख, अल्पेश जाधव, सतीश जाधव, मालबिडीचे सागर डी.जाधव, युवक काँग्रेसचे कल्पेश पाटील, राकेश जाधव, आणि अजय तनपुरे, अंकुश तनपुरे,  संजय पाटील ,रामदास पाटील इत्यादी तरुणांनी सहभाग घेतला. 

Web Title: ‘My way is my responsibility’; The potholes on the highway were filled with labor by the working class workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.