शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

'कला, माणूसपणाच्या प्रवासात माझे पाय जमिनीवरच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:17 IST

डोंबिवलीत ‘चतुरंग’च्या कार्यक्रमात संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांच्यासोबत रंगल्या दिलखुलास गप्पागोष्टी

डोंबिवली : एखाद्या कलाकाराची कलाकृती गाजते, तेव्हा त्याला प्रेक्षक डोक्यावर उचलून घेतात. त्याच कलाकाराचा आयुष्यातील उत्तरार्ध हा कधीकधी वाईट असतो. कला उत्तुंग होते, तेव्हा माणूस म्हणून आपणही उत्तुंग व्हावे. हा समांतर प्रवास करताना मी माझे पाय जमिनीत घट्ट रोवले आहेत, असे मत नृत्य, निवेदन, अभिनय, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेली रंगयात्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी व्यक्त केले.‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या उपक्रमांतर्गत संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचा रसिकांसोबत दिलखुलास गप्पागोष्टींचा कार्यक्रम शनिवारी सुयोग मंगल कार्यालयात झाला. यावेळी त्या बोलत होत्या. संपदा म्हणाल्या, ‘प्रत्येक क्षेत्रात समोरच्या व्यक्तीशी आदर ठेवून वागा. आपले अस्तित्व कधी दाखवावे, हे मी ‘आॅल द बेस्ट’ या नाटकापासून शिकले. या नाटकाच्या वेळी एका प्रेक्षकाने आगाऊपणे दाद दिली होती. त्याला मी तेथेच प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या क्षेत्रातील पुढील प्रवास खूपच चांगला झाला. मुलींनी ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्या तेथेच रोखल्या पाहिजेत. आपली आब आपणच राखली पाहिजे. या क्षेत्रात सौंदर्याला महत्त्व आहे. त्याला चांगल्या शब्दांत प्रोत्साहन द्यायला शिकले पाहिजे.’त्या पुढे म्हणाल्या, ‘कलाकाराला पडद्यामागीलही कामे आली पाहिजेत, असा आग्रह मोहन वाघ यांनी धरला होता. त्यामुळे आम्ही सर्व कामे करायला शिकलो. आता निर्मिती आणि दिग्दर्शन करताना केलेल्या कामाचाच अनुभव उपयोगी पडत आहे. माझे बालपण चाळीत गेले. तेथील वातावरण हे फार गोड होते. गणेशोत्सवातील कार्यक्रमात नृत्य सादर करून अनेक बक्षिसे मिळवली आहेत. आम्ही नाटक स्वत: बसवायचो. कधी एखाद्या कार्यक्रमात रोल मिळाला नाही, तर पडदा पाडण्याचे कामही केले आहे. मी ज्या क्षेत्रात वावरत आहे, ती सर्व क्षेत्रे अभिव्यक्तीची आहेत. त्यांचे खंडण तुम्ही करता. अभिव्यक्ती करणारी कलावंत म्हणून मी नंबर एकलाच आहे. माझ्या पहिल्या नाटकाच्या आठवणी काढून प्रेक्षक प्रश्न विचारत आहेत, म्हणजेच अभिव्यक्तीच्या क्षेत्रात मी मास्टर्स आहे. एखाद्या कलाकृतीच्या पुढे दुनिया झुकते. पण, ते यश चिरकाल टिकणारे नसते. पुढील काळात चित्रपट दिग्दर्शन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.माझ्या जडणघडणीला सुरुवात शाळेतून झाली. शाळा ही सावलीसारखी माझ्या पाठीशी आहे. राहावे कसे, विचार कसा करावा, हे शाळेकडून शिकले. माणसाकडे माणूस म्हणून पाहा. माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. माणसांची क्षमता ओळखून त्यांना समजून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.कलाकारांमुळेच संगीत रंगभूमी लयालासंगीत रंगभूमी मृत झाली आहे, असे बोलले जात असले, तरी ती मारण्याचे काम कलाकारांनीच केले आहे. एखादा कलावंत दोन तास, तर दुसरा दीड तास गातो. कुठे थांबायचे, हे न कळल्यामुळे संगीत रंगभूमी मृत झाली आहे.संगीत मत्स्यगंधा हे नाटक करताना ते अडीच तासांच्या वर करणार नाही आणि चार मिनिटांच्या वर गाणे असणार नाही, हे मी ठरवले होते. प्रेक्षकांची जास्त ऐकण्याची क्षमता नाही, हे पाहून नाटक बांधावे लागते. एखाद्या कलाकृतीसाठी कलाकार शोधले पाहिजेत.समुद्र धुंडाळून काढला तरच हिरा मिळेल. योग्य कलाकार मिळाल्याशिवाय नाटक करायचे नाही, हे ठरवले होते. मी तडजोड करत नाही, हा माझा दोष आहे, असे संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे