मुस्लीम व्यापाऱ्याचा नगरमधील मराठी शेतकऱ्याला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:41 AM2021-04-22T04:41:22+5:302021-04-22T04:41:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : रमजाननिमित्त तयार केलेली विशिष्ट जातीची कलिंगडे घेऊन विक्रीसाठी अहमदनगर येथील तरुण व प्रगतिशील शेतकरी ...

Muslim trader lends a helping hand to Marathi farmers in the city | मुस्लीम व्यापाऱ्याचा नगरमधील मराठी शेतकऱ्याला मदतीचा हात

मुस्लीम व्यापाऱ्याचा नगरमधील मराठी शेतकऱ्याला मदतीचा हात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : रमजाननिमित्त तयार केलेली विशिष्ट जातीची कलिंगडे घेऊन विक्रीसाठी अहमदनगर येथील तरुण व प्रगतिशील शेतकरी भिवंडीत आला होता. चार ते पाच दिवस उलटूनही त्याच्याकडील कलिंगडाची विक्री झाली नसल्याने तरुणाची मेहनत वाया जाऊ नये म्हणून दहा टन कलिंगड चढ्या भावाने विकत घेऊन होतकरू शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न भिवंडीतील मुस्लीम व्यापाऱ्याने केला आहे. ही कलिंगडे खरेदी करून या मुस्लीम व्यापाऱ्याने फक्त तरुण शेतकऱ्याला मदतीचा हात दिला नाही तर ऐन रमजान सणात हिंदू-मुस्लीम एकात्मतेची प्रचितीही दाखवली आहे.

अहमदनगर येथील प्रगतिशील शेतकरी सूरज भालसिंग यांनी आपल्या दीड एकर शेतात सात ते आठ हजार कलिंगडाची रोपे लावून पीक घेतले आहे. विशेष म्हणजे ही सर्व कलिंगडे आधुनिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविली जाणारी आहेत. आरोही आणि विशाल अशा दोन जातींची ही कलिंगडे आहेत. आरोही जातीचे कलिंगड हे वरून हिरवे, तर कापल्यानंतर पिवळे तर विशाल जातीचे कलिंगड हे वरून पिवळे तर कापल्यानंतर लाल दिसते. ही कलिंगडे भरपूर पौष्टिक अशी आहेत. सूरज यांनी या कलिंगड पिकांसाठी खूप मेहनत घेतली होती. आणि आता ही सर्व कलिंगड बाजारात विकण्यासाठी तयारही झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे कलिंगड विकायची कशी आणि कुठे या चिंतेत तो होता. रमजान महिना असल्याने भिवंडीसारख्या शहरात कलिंगड विकली जातील या आशेवर या शेतकऱ्यांनी अहमदनगर येथून ट्रकभर कलिंगड भिवंडीत आणली. मात्र तीन ते चार दिवसांपासून कलिंगडांची विक्री होत नसल्याने सूरज हवालदिल झाला होता.

भिवंडीतील व्यावसायिक वाहिद खान यांचे या कलिंगडांकडे लक्ष गेले व त्यांनी या शेतकऱ्यांची विचारपूस केली. सूरज हा सुशिक्षित असून, शेतीत नवा प्रयोग करावा यासाठी कलिंगडाच्या नव्या जातीचे पीक घेतले, मात्र लॉकडाऊनमुळे आमची सर्व मेहनत वाया जाईल, अशी भीती त्याने व्यावसायिक खान यांच्याकडे व्यक्त केली. अखेर खान यांनी त्याच्याकडील सर्व दहा टन कलिंगड चढ्या भावाने विकत घेतली. भिवंडीत आणलेल्या कलिंगडसाठी सूरज यांना ९० ते ९५ हजार भाव येणे अपेक्षित असताना वाहिद यांनी सूरज यांना या सर्व कलिंगडाची दोन लाखाहून अधिक रक्कम देऊन खरेदी केली.

----------------------------

गरीब, पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत देणार

लॉकडाऊनमुळे त्याच्या मालाची विक्री होत नसल्याने मी सर्व कलिंगड खरेदी केली. माझ्या या छोट्याशा मदतीने त्याच्या चेहऱ्यावर हसू आले यातच मला समाधान मिळाले. तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी माझा हा प्रयत्न आहे. सध्या पवित्र रमजान सण सुरू आहे, त्यातच कोरोनामुळे शहरात पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे ही सर्व कलिंगड मी गरीब गरजूंना व पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत वाटप करणार अशी प्रतिक्रिया व्यावसायिक वाहिद खान यांनी व्यक्त केली.

===Photopath===

200421\20561832-img-20210420-wa0023.jpg

===Caption===

भिवंडीत दिसली हिंदू मुस्लिम एकात्मता .....

रमजान सणात मुस्लिम व्यापाऱ्याची मराठी तरुण शेतकऱ्यास मदतीचा हात ; तब्बल दहा टन कलिंगड केला चढ्या भावाने खरेदी 

Web Title: Muslim trader lends a helping hand to Marathi farmers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.