मुंब्र्यात तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:20 IST2021-02-28T05:20:37+5:302021-02-28T05:20:37+5:30

मुंब्रा : एका ३० ते ३५ वयाच्या अनोळखी तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह मुंब्र्यातील मित्तल मैदानाजवळील नाल्यावर असलेल्या ...

Murder of a youth in Mumbra | मुंब्र्यात तरुणाची हत्या

मुंब्र्यात तरुणाची हत्या

मुंब्रा : एका ३० ते ३५ वयाच्या अनोळखी तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह मुंब्र्यातील मित्तल मैदानाजवळील नाल्यावर असलेल्या पुलाच्या बाजूला फेकून देण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या तरुणाच्या गळ्यावर शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, या तरुणाची ओळख पटविण्याचा, तसेच त्याची हत्या कोणी व का केली, याचा तपास पोलीस करीत आहेत. लवकरच सत्य उघडकीस येईल, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

-----------------

Web Title: Murder of a youth in Mumbra