शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून: पत्नीसह तिच्या मित्राला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:31 IST

विवाहित असूनही फेसबुकवरुन वर्षभरापूर्वी मैत्री झालेल्या मित्राशी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी गोपी नाईक या सफाई कामगार पतीचा खून करणा-या प्रिया नाईक (२८) आणि महेश कराळे या तिच्या मित्राला सोमवारी रात्री नेरुळ येथून कासारवडवली पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाईसीसीटीव्हीच्या आधारे मिळाला दुवानेरळ येथून दोघांनाही घेतले ताब्यात

ठाणे: अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या गोपी (३०) या आपल्याच पतीचा महेश कराळे (२८, रा. नेरळ, जि. रायगड) या मित्राच्या मदतीने खून करणा-या प्रिया नाईक (२८) आणि तिच्या मित्राला सोमवारी रात्री नेरुळ येथून कासारवडवली पोलिसांनी अटक केली. अपघाताचा बनाव करुन या दोघांनीही जखमी गोपीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करुन पलायन केले होते.घोडबंदर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफाल्य आवास या टीएमसी बिल्डींग मधील तिस-या मजल्यावर गोपी नाईक या ठाणे महापालिकेच्या सफाई कामगार गोपी नाईक  याला २९ डिसेंबर रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याची पत्नी प्रिया हिने दाखल केले. गंभीर जखमी अवस्थेतील ही व्यक्ती मृत पावल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितल्यानंतर ती तिथून पसार झाली. हा खूनाचा प्रकार असल्याचे आढळल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले आदींच्या पथकाने सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रिया नाईक आणि तिचा कथित मित्र महेश कराळे या दोघांनाही नेरळ ( जि. रायगड) येथून सोमवारी रात्री ताब्यात घेतले. प्रिया विवाहित असूनही तिच्याशी महेशची फेसबुकद्वारे एक वर्षापूर्वी मैत्रि झाली होती. सहा महिन्यांपूर्वी ते एकमेकांच्या जास्त ‘जवळ’ आले. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार प्रियाचा पती गोपी याच्याही लक्षात आला. त्याने त्यांच्या या अनैतिक संबंधांना विरोध केला. त्यामुळेच त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. आपल्या अनैतिक संबंधाच्या आड येणा-या पतीचाच काटा काढायचे तिने ठरविले. त्यानुसार २९ डिसेंबर रोजी जेवणातून त्यांनी गोपीला झोपेच्या गोळया दिल्या. तो झोपी गेल्यानंतर त्याचा गळा आवळण्यात आला. नंतर रॉडने त्याच्यावर प्रहार करुन त्याचा खून करण्यात आला. तो अपघातात जखमी झाल्याचा बनाव करुन दोघांनी एका मोटारसायकलवरुन त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू, इमारतीच्या सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचे बिंग फुटले आणि त्यांना अटक केल्याची माहिती ढोले यांनी दिली. दोघांनाही ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून