शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

घराजवळ थुंकल्याने अल्पवयीन मुलाचा खून; मुंब्य्रातील घटना, आरोपीस केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:15 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी दशरथ काकडे याने रुपेशच्या आईला खोटे सांगून त्याला परिसरातील बंद असलेल्या ठामपाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले.

मुंब्रा : दिव्यातील नागवाडी परिसरात राहत असलेल्या दशरथ काकडे याने त्याच्या घराजवळ थुंकणाऱ्या रुपेश गोळे या १३ वर्षांच्या मुलाचा राग आल्याने त्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी दशरथ काकडे याने रुपेशच्या आईला खोटे सांगून त्याला परिसरातील बंद असलेल्या ठामपाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले. तेथे गळा दाबून त्याचा खून केला. मयत मुलाचे वडील विजय यांनी याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरून काकडे याला पोलिसांनी अटक केली. दिवा पश्चिम येथील नागवाडी भागात रुपेश हा वडील विजय आणि आईसोबत राहत होता. त्याच्या शेजारी दशरथ हा राहत असून, तो रुपेशचा नातेवाईकही आहे. दिवा येथे सुरू असलेल्या गावदेवीच्या जत्रेला रुपेशला नेतो, असे विजय यांना खोटे सांगून दशरथ हा रुपेशला रविवारी दुपारी ३.३० वाजता घेऊन गेला होता. सायंकाळी दशरथ घरी परतला; परंतु त्याच्यासोबत रुपेश नव्हता. त्यामुळे विजय यांनी दशरथला रुपेशबद्दल विचारले असता, त्याने तो जत्रेत खेळत असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत रुपेश घरी न आल्याने विजय यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दशरथला ताब्यात घेतले. त्यावेळी आपण रुपेशला घेऊन गेल्यानंतर त्याला फेरीवाल्याकडून कपडे खरेदी करून दिले आणि त्यानंतर जत्रेत नेले, असे सांगितले.  दिव्यात केवळ सायंकाळीच बाजार भरतो; परंतु दशरथने रुपेशला दुपारी नेले होते, त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. सोमवारी पोलीस त्याला बाजारात घेऊन गेले, हे कपडे खरेदी केले, याबद्दल विचारले. त्यानंतर दशरथने एका फेरीवाल्याकडे नेले पण त्याने नकार दिला.

स्वच्छतागृहात मृतदेहदिवा येथील एका निर्जनस्थळी ठाणे महापालिकेचे एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहात कोणीही फिरकत नाही. या स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले. त्याठिकाणी त्याचा गळा आवळून खून केला. मृतदेह तिथेच सोडून दशरथ हा घरी आला होता. सोमवारी पोलिसांनी रुपेशचा मृतदेह स्वच्छतागृहातून बाहेर काढला. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस