डोंबिवलीत संशयातून पुतणीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST2021-06-19T04:26:47+5:302021-06-19T04:26:47+5:30

डोंबिवली : मानलेल्या भाच्याशी संबंध असल्याच्या संशयातून काकाने पुतणीची हत्या केल्याची घटना पूर्वेतील टंडन रोडवरील क्रांतीनगर झोपडपट्टीतील रोहिदास चाळीत ...

Murder of nephew out of suspicion in Dombivali | डोंबिवलीत संशयातून पुतणीची हत्या

डोंबिवलीत संशयातून पुतणीची हत्या

डोंबिवली : मानलेल्या भाच्याशी संबंध असल्याच्या संशयातून काकाने पुतणीची हत्या केल्याची घटना पूर्वेतील टंडन रोडवरील क्रांतीनगर झोपडपट्टीतील रोहिदास चाळीत घडली. मयुरेश सफलिंगा (वय ३०), असे आरोपी काकाचे नाव असून, त्याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मयुरेश हा मोठा भाऊ, त्याची पत्नी, १३ वर्षांची पुतणी आणि मानलेला भाच्यासह राहतो. गुरुवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान पुतणी ही मानलेल्या भाच्याच्या जवळ झोपल्याचे पाहून मयुरेशने याचा जाब मोठ्या भावाला विचारला. दोघांमध्ये संबंध असल्याच्या संशयावरून सुरुवातीला मयुरेशने भाच्याला मारले. नंतर पुतणीला मारहाण करताना तिचे डोके खिडकीच्या दगडी कडप्यावर आपटून तिला गंभीर जखमी केले. जखमी झाल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले. तेथून ती घरी आली आणि बेशुद्ध पडली असता पुन्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी तिच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी मयुरेशला अटक केली आहे.

----------------

Web Title: Murder of nephew out of suspicion in Dombivali