फळे विक्रेत्याची हत्या ; चौघांना कोठडी
By Admin | Updated: April 25, 2017 23:57 IST2017-04-25T23:57:29+5:302017-04-25T23:57:29+5:30
पाच लाखांची सुपारी देऊन फळविक्रेत्याची हत्या घडवून आणल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या चौघा आरोपींना

फळे विक्रेत्याची हत्या ; चौघांना कोठडी
मीरा रोड : पाच लाखांची सुपारी देऊन फळविक्रेत्याची हत्या घडवून आणल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या चौघा आरोपींना ठाणे न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. हत्येसाठी झारखंडवरून अवघ्या दीड हजारात खरेदी केलेला देशी कट्टा तसेच दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
शामू लहुरी गौड (४०) याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. (प्रतिनिधी)