मृत महिलेवर हत्येचा गुन्हा

By Admin | Updated: March 21, 2017 03:41 IST2017-03-21T03:41:00+5:302017-03-21T03:41:00+5:30

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून स्वत:च्या दोन मुलांना खाली फेकून स्वत: उडी मारल्यामुळे

Murder of a deceased woman | मृत महिलेवर हत्येचा गुन्हा

मृत महिलेवर हत्येचा गुन्हा

मुंब्रा : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून स्वत:च्या दोन मुलांना खाली फेकून स्वत: उडी मारल्यामुळे निधन झालेल्या मुंब्य्रातील महिलेवर मुलीची हत्या व मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शीळ-डायघर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. शिरीन खान या महिलेने रविवारी शीळफाट्यातील एका इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून तीन वर्षांच्या मुलीला व पाच वर्षांच्या मुलाला फेकून स्वत: उडी मारली. यात तिच्यासह मुलीचा मृत्यू झाला. तर, मुलगा गंभीर जखमी आहे. घरातील भांडणामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. काटकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Murder of a deceased woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.