खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:42 IST2021-04-04T04:42:21+5:302021-04-04T04:42:21+5:30
मृताचे गावातील एका इसमाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तसेच, आरोपीची पत्नी तिच्या माहेरी निघून गेली हाेती. ...

खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला
मृताचे गावातील एका इसमाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तसेच, आरोपीची पत्नी तिच्या माहेरी निघून गेली हाेती. ती परत पतीकडे येण्यास तयार नव्हती. तिने सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्याने आरोपीने रागाच्या भरात मृताच्या डाेक्यावर हत्याराने गंभीर दुखापत करून त्याला जीवे मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृताचे हातपाय बांधून ओझर्ली येथील कपिल पाटील यांच्या फार्महाउसजवळ भातसा नदीच्या पात्रात मृतदेहास दगड बांधून पाण्यात फेकून दिला. मात्र, मृतदेह फुगून पाण्यावर तरंगू लागला. यानंतर मृताच्या पत्नीने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर, उपविभागीय अधिकारी, मुरबाड डाॅ. बसराज शिवपुजे, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर मुंढे, विजय सुर्वे, हेडकॉन्स्टेबल गोविंद कोर, सोमनाथ भांगरे घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला शुक्रवारी संध्याकाळी उशिरा अटक करत शनिवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.