शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
3
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
4
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
5
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
6
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
7
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
8
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
9
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
10
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
11
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
12
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
13
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
14
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
15
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
16
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
17
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
18
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
19
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
20
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Daily Top 2Weekly Top 5

पालिका उपायुक्ताला २५ लाखांची लाच घेताना अटक; अतिक्रमण हटविण्यासाठी मागितले होते ५० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:08 IST

घंटाळी परिसरातील अतिक्रमणे हटवून मुंबईतील बिल्डरला सहकार्य करण्यासाठी २५ लाखांची लाच  घेताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी अटक केली.

ठाणे : घंटाळी परिसरातील अतिक्रमणे हटवून मुंबईतील बिल्डरला सहकार्य करण्यासाठी २५ लाखांची लाच  घेताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी अटक केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.एसीबीच्या सूत्रांनुसार,  मुंबईतील एका बिल्डरची घंटाळी परिसरात जागा आहे. या जागेवर अतिक्रमण होते. ते हटविण्यासाठी  पाटोळे यांनी ५० लाखांची लाच मागितली हाेती. यातील दहा लाख बिल्डरने काही दिवसांपूर्वी दिले हाेते. त्यानंतर उर्वरित ४० लाख देण्याआधी  त्याने मुंबई एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या विशेष पथकाने बुधवारी सापळा रचून पाटोळे यांना उर्वरित ४० पैकी २५ लाखांची  लाच घेताना  अटक केली. एसीबी अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कागदपत्रांची उशिरापर्यंत  छाननी केली. त्याचवेळी पाटोळे यांच्या घरी शोध मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावरअतिक्रमणांवरून उच्च न्यायालयाने आयुक्त सौरभ राव यांची ‘हजेरी’ घेतली असतानाही ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे, तोच अधिकारी लाच घेताना पकडला गेला आहे.

वर्धापनदिनीच मोठा धक्कागेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू  आहेत. न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवरून आयुक्त राव यांना अक्षरश: धारेवर धरल्यावर ही कारवाई सुरू झाली. मात्र, ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारे हेच अधिकारी असल्याचे आता उघड झाले आहे. कारवाई करण्याकरिता व न करण्याकरिताही लाचेची मागणी होत असल्याचेच संकेत या कारवाईमुळे प्राप्त झाले.  योगायोगाने ठाणे महापालिकेचा बुधवारी  ४३ वा वर्धापनदिन होता. याच दिवशी ही कारवाई झाल्याने महापालिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचे बाेलले जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Municipal Deputy Commissioner Arrested Taking Bribe for Removing Encroachments

Web Summary : Thane Municipal Corporation's Deputy Commissioner Shankar Patole was arrested for accepting a ₹25 lakh bribe to remove encroachments for a builder. He originally demanded ₹50 lakh. The arrest occurred on the corporation's anniversary, exposing corruption despite ongoing encroachment drives ordered by the high court.
टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणthaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका