शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीत जाणारे सांडपाणी थांबवण्याचा पालिकेचा प्रयत्न, अमृत अभियानात 34 कोटींच्या निधीला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 18:32 IST

बदलापूर: उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यात बदलापूर नगरपालिका अपयशी ठरली होती. कोट्यवधीची भुयारी गटार योजनेचे काम करून सुद्धा आजही सांडपाणी हे थेट नदीत सोडण्यात येत आहे.

बदलापूर: उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यात बदलापूर नगरपालिका अपयशी ठरली होती. कोट्यवधीची भुयारी गटार योजनेचे काम करून सुद्धा आजही सांडपाणी हे थेट नदीत सोडण्यात येत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी अमृत योजनेतून भुयारी गटाराच्या दुस-या टप्प्याचे काम पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. या 34 कोटींच्या योजनेला पालिकेने मंजुरी दिली आहे.बदलापूर शहराचे सांडपाणी तीन वेगवेगळ्या ठिकाणी उल्हास नदीपात्रात सोडण्यात येते आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला मात्र अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नसलेला भुयारी गटार प्रकल्प कोटयवधींचे पैसे खर्चूनही अपूर्ण आहेत. यात 22 एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारण्यात आले आहे. मात्र शहरातील भुयारी गटार वाहिन्यांना रहिवाशी सांडपाण्याच्या वाहिनी जोडल्या गेल्या नसल्याने अवघे 5 दशलक्ष लिटर्स ऐवढेच सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. जोडण्या पूर्ण न झाल्याने आजही विविध नाल्यातून उल्हास नदी पात्रात सांडपाणी जाऊन प्रदूषण होते आहे. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुळगाव बदलापूर नगरपालिकेला नोटीस पाठवली होती. त्यावर प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देऊन पालिकेने वेळ मारून नेली.मात्र अद्यापही सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते आहे. यावर उपाय म्हणून आता अतिरिक्त 70 कोटींच्या अमृत अभियानाच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. यात उल्हास नदीपात्रात सांडपाणी जाणा-या तीन ठिकाणी मुख्य सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवले जाणार आहे. तर त्यातल्या दोन ठिकाणी छोटे प्रक्रिया प्रकल्पही उभारले जाणार आहेत.नदीत जाणारे हे सांडपाणी रोखण्यासाठी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. मात्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तपासणी झालेल्या या प्रकल्पासाठी 34 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याविषयी चर्चा करण्यात आली होती. यासाठी सात ठिकाणच्या जागांचा विचार करण्यात आला असून त्या ताब्यात आल्या की कामाला सुरूवात होणार आहे. मात्र हे काम कधीर्पयत पूर्ण होणार याची निश्चिती पालिकेनेही दिलेली नाही. त्यामुळे ही योजना देखील आधीच्या योजनेप्रमाणो रखडणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर