शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांच्या मुळावर उठले महापालिकेचे सुशोभीकरण, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:15 IST

Mira Bhayander News : भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस ये-जा करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या काही हजारांच्या घरात असताना महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर तब्बल आठ कोटी रुपये खर्चाचे सुशोभिकरणाचे कंत्राट देऊन काम सुरू केले.

मीरा रोड  - सर्वांसाठी लोकलची दारे  १ फेब्रुवारीपासून खुली झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. भाईंदर स्थानकातून पश्चिमेस बाहेर येणारा मुख्य पूल खुला केला आहे; परंतु पालिकेने केलेल्या सुशोभिकरणाच्या कामामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याने बांधकाम तोडा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस ये-जा करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या काही हजारांच्या घरात असताना महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर तब्बल आठ कोटी रुपये खर्चाचे सुशोभिकरणाचे कंत्राट देऊन काम सुरू केले. मुळात येथे आधीच जागा कमी असून, सार्वजनिक व खासगी बस, रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड आहे; परंतु प्रवाशांच्या गैरसोयीचा आणि प्रत्यक्ष स्थितीचा कोणताच सारासार विचार न करता तब्बल आठ कोटी रुपयांचे सुशोभिकरण पालिकेने सुरू करून रस्त्याचा व रेल्वेचे जिने - तिकीट घर यांचा समतोल न राखताच पाच फुटांपेक्षा जास्त उंचीचा पाया बांधला आहे. त्यामुळे रेल्वेपुलावर तसेच तिकीट खिडकीकडे ये - जा करण्यासाठी प्रवाशांचे हाल होत आहेत. वृद्ध, महिला यांना तर हे जोखमीचे झाले आहे.या कामामुळे मधल्या जिन्याकडे ये - जा करण्यासाठीचा मार्गही चिंचोळा झाला असून, तेथे फेरीवाले आणि दुचाकीचे अतिक्रमण त्रासात भर घालत आहे. या बांधकामामुळे मुख्य रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल हाेत आहेत. महापालिकेने चालविलेले हे सुशोभिकरण नव्हे, तर लोकांचे हाल करणारे काम आहे. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केली जाते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. हे काम बंद करायला लावले आहे; पण झालेले बांधकाम काढून नागरिकांसाठी रेल्वे परिसर मोकळा केला नाही तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्यासाठी सरकारकडे तक्रार करू.- गीता जैन, आमदार सत्ताधारी भाजपने मनमानी करून नागरिकांचा छळ चालविला आहे. भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेरील हे बांधकाम हटवले नाही तर शिवसेना आंदोलन करेल.- कॅटलीन परेरा, माजी महापौर

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक