शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कर थकविणाऱ्या ८८२ मालमत्तांवर पालिकेची जप्तीची कारवाई, १५९ मालमत्ता केल्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 18:22 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डिसेंबर महिन्यापासूनच थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार १५९ मालमत्ता सील करण्यात आल्या असून ९८ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेने केल्या ९८ नळ जोडण्या खंडीतआॅनलाईनद्वारे सुध्दा कर भरणा करण्याची सुविधा

ठाणे - ठाणे महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर व पाणी कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली असून देयके न भरणाºयांविरुध्द धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतंर्गत ८८२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करत १५९ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. तर ९८ नळ जोडण्या खंडीत करण्यांत आले आहेत. दरम्यान जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपली मालमत्ता कर आणि पाणी कराची थकबाकी रक्कम तत्काळ भरावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.                     ठाणे महापालिकेने २०१८-१९ या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर कडक कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महापलिकेच्या प्रभागनिहाय ही कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना मालमत्ता कर जमा करणे सोईचे व्हावे या दृष्टीकोनातून १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यत महापालिकेची सर्व मालमत्ता कर संकलन केंद्र सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (२१ मार्च, २०१९ वगळून) पुर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत कार्यान्वीत राहणार आहेत. तसेच ज्या गृहसंकुलात, उद्योग संकुलात मालमत्ता कराची सदनिका, युनिटनिहाय स्वतंत्र बिले दिली जातात, अशा गृहसंकुल,उद्योग संकुलात मालमत्ता कर वसुलीचा कॅम्प संबंधितांच्या विनंतीनुसार आयोजित करण्यांत येईल. यासाठी प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहनही पालिकेने केले आहे.महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आॅनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर वेळेत भरुन सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाTaxकर