महापौरांवर टीका करणारे पोस्टर काढण्याची महापालिकेची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:53 IST2021-02-27T04:53:53+5:302021-02-27T04:53:53+5:30

ठाणे : एकीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या कोरोना लसीबाबत भाजपने शहरभर लावलेले पोस्टर अवघ्या काही तासांतच काढण्याची ...

Municipal Corporation rushed to remove posters criticizing the mayor | महापौरांवर टीका करणारे पोस्टर काढण्याची महापालिकेची लगीनघाई

महापौरांवर टीका करणारे पोस्टर काढण्याची महापालिकेची लगीनघाई

ठाणे : एकीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या कोरोना लसीबाबत भाजपने शहरभर लावलेले पोस्टर अवघ्या काही तासांतच काढण्याची लगीनघाई शुक्रवारी महापालिकेने सुरू केल्याचे दिसले. यावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. शहरात एवढे अनधिकृत पोस्टर लागले असतानाही हेच पोस्टर कसे दिसले, असा सवालही त्यांनी केला.

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले अनधिकृत पोस्टर आजही उतरविण्यात आलेले नाहीत. त्याकडे महापालिकेच्या या विभागाचे लक्ष गेलेले नाही. परंतु, सत्तेची मगरुरी आलेल्या शिवसेनेला मात्र आम्ही लावलेलेच पोस्टर दिसले असून, महापालिकेनेदेखील ते उतरविण्यासाठी लगीनघाई केल्याने आश्चर्य वाटत असल्याची टीका भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. आमचे पोस्टर अनधिकृत असतील तर आधीपासून शहरभर झळकत असलेले पोस्टर पालिकेला दिसले नाहीत का? त्याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Municipal Corporation rushed to remove posters criticizing the mayor