महापालिकेने केली विक्रमी वसुली
By Admin | Updated: November 16, 2016 04:23 IST2016-11-16T04:23:46+5:302016-11-16T04:23:46+5:30
काळ्या पैशाच्या उच्चाटनासाठी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने आपल्या जवळील या नोटा

महापालिकेने केली विक्रमी वसुली
ठाणे : काळ्या पैशाच्या उच्चाटनासाठी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने आपल्या जवळील या नोटा कुठे खर्ची करायचा असा मुद्दा अनेकांना सतावत होता. परंतु, शासनाने शासकीय कार्यालयांना या नोटा स्वीकारण्यास सांगितल्याने याचाच फायदा घेऊन ठाणे महापालिकेने थकबाकीदार करदात्यांसह उर्वरित करदात्यांनादेखील या नोटा स्वीकारल्या जातील, असे सांगितले होते. त्यानुसार अवघ्या चार दिवसात महापालिकेने मालमत्ताकर आणि पाणीपट्टी आकारपोटी तब्बल २५ कोटींची वसुली केली आहे.
गेल्या मंगळवारी केंद्र सरकाराने या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन शासकीय कार्यालयांना त्या स्वीकारण्यासाठी ११ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत मुभा दिली होती. परंतु, त्यानंतर ही मुदत वाढवून १४ नोव्हेंबर अशी केली होती. त्यानुसार महापालिकेने मालमत्ताकरासह पाणीपट्टीच्या वसुलीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत १० प्रभाग समितीत हे दोन्ही विभाग सुरु ठेवले होते. त्यानुसार गुरुवार ते सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत या विभागांकडून ही विक्रमी वसुली केली आहे.
विशेष म्हणजे ही वसुली करण्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अतिरिक्त वसुली काऊटंर सुरु केले होते. तर दुपार नंतर महापालिका मुख्यालयातील स्टाफही या कामासाठी दिला होता.