शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मेअखेरपर्यंत पालिका करणार ४० टक्के ऑक्सिजन निर्मिती - ठाणे महानगरपालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 09:24 IST

महापालिकेच्या तीन कोविड सेंटरला सध्या दिवसाला ६२ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. परंतु ४७ मेट्रिक ऑक्सिजन उपलब्ध आहे.

ठाणे  : ठाण्यात पुन्हा काही अंशी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र मे अखेरपर्यंत हवेतून ऑक्सिजननिर्मिती करून ४० टक्के कमतरता भरून काढण्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी केला. महापालिकेच्या तीन कोविड सेंटरला सध्या दिवसाला ६२ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. परंतु ४७ मेट्रिक ऑक्सिजन उपलब्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून सध्या ३.२ मेट्रिक टन निर्मिती केली जात आहे. परंतु, मेअखेरपर्यंत ती वाढवून १५ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या तीन सेंटरच्या ठिकाणी आणखी ३६ मेट्रिक टनचे टॅंक उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास येथे तीन कोविड सेंटर पालिका चालवत आहे. व्होल्टास येथील कोविड सेंटर लवकरच सुरू केले जाणार आहे. या तीनही ठिकाणी प्रत्येकी १२ मेट्रिक टन ऑक्सिजनचे टॅंक उपलब्ध आहेत. मेअखेर या तीनही ठिकाणी अतिरिक्त १२ मेट्रिक टनचे टॅंक पालिका उभारणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही, तर यातील हे १२ मेट्रिक टनाचे टॅंक पुढील २४ तासासाठी कामाला येऊ शकणार आहेत. सध्या पार्किंग प्लाझा येथे हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा प्लान्ट उभारला आहे, त्यातून दिवसाला ३.२ मेट्रिक टन निर्मिती होत आहे. हा ऑक्सिजन येथील ३५० बेडसाठी पुरत आहे. त्यामुळे या ३५० बेडसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वापरले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिल्लक मेडिकल ऑक्सिजन हे व्हेंटिलेटर आणि आयसीयूसाठी वापरले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेच हवेतून निर्माण होणारे ऑक्सिजन व्हेंटिलेटर किंवा आयसीयूसाठी वापरले गेले तर तर ६० बेडसाठीच ते वापरले जाऊ शकणार आहे. 

मेअखेर १५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती  सध्या पार्किंग प्लाझा येथे ३.२ मेट्रिक टन हवेतून ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. परंतु, आता येथील क्षमता आणखी दोन मेट्रिक टनने वाढवून ती ५.२ मेट्रिक टन करण्यात येणार आहे. ग्लोबल रुग्णालय आणि व्होल्टास येथेदेखील प्रत्येकी ५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे मेअखेर १५ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार असून ठाणे ही देशातील ४० टक्के ऑक्सिजन निर्माण करणारी पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा आयुक्तांनी व्यक्त केला.

ठाण्यात विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये फक्त नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकांसाठीच ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र बुधवारपासून सुरू करण्यात येत असून केवळ १०० ज्येष्ठ नागरिकांनाच सकाळी १० ते १ या वेळेत कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. या केंद्रावर फक्त कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. येथे नागरिकांना पहिला डोस दिला जाणार नसल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले. 

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस