शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमधील पडिक वाहनांविरोधात महापालिकेची कारवाई सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 20:51 IST

मीरा-भाईंदरमध्ये रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे

मीरारोड - मीरा-भाईंदरमध्ये रस्ते तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बेवारस वा पडीक अवस्थेत असलेल्या वाहनांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. त्यातही रस्ते, पदपथ, उद्याने, मैदाने व अन्य सार्वजनिक ठिकाणी बऱ्याच कालावधीपासून पडून असलेल्या वाहनांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, 48 तासांत वाहन उचलले नाही तर पालिका ते उचलून नेणार आहे. मीरा-भाईंदरमधील रस्ते, पदपथ तसेच सार्वजनिक मोक्याच्या जागा फेरीवाले, बेकायदा पार्किंग तसेच दुकान चालक आदींनी व्यापलेली आहे. यामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना रहदारीला नेहमीच अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत असते. पालिका व पोलीस यांच्याकडून यावर ठोस कारवाई होत नाही हे वास्तव आहे. हा सर्व जाच कमी म्हणून की काय, शहरातील रस्ते, पदपथ, स्मशानभूमी, उद्याने, नाके, मैदाने इतकेच आदी अनेक सार्वजनिक ठिकाणी भंगार अवस्थेतील पडीक वाहनं सर्रास काही महिने - वर्षांपासून उभी केलेली आहेत. या वाहनांवर सातत्याने कारवाईची मागणी होत असते.परंतु कारवाईला पालिका वा पोलिसांना मुहूर्त काही मिळत नव्हता. आता आयुक्त बालाजी खतगावकर यांनी या पडीक - बेवारस वाहनांविरुद्ध कारवाईचे आदेश जरी केले आहेत . त्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना अशा वाहन मालक व त्या वाहनांवर नोटिसा बजावण्यास सांगण्यात आले आहे . त्यासाठी प्रभाग अधिकारी यांच्यासह कनिष्ठ अभियंता व स्वच्छता निरीक्षक आदींनी अश्या पडीक - बेवारस वाहनांचे सर्वेक्षण करायचे आहे . 

 

महापालिका अधिनियमातील तरतुदी नुसार सदर वाहनां मुळे रहदारीला अडथळा होतो . साफसफाई करणे शक्य होत नसल्याने घाण तशीच राहते . आग लागण्याचा धोका असतो . परिणामी संबंधितांना नोटीस बजावून दोन दिवसात वाहन काढून घेण्याचे सांगण्यात आले आहे . सदर वाहन न काढल्यास महापालिके मार्फत कर्षण करण्यात येईल . ते सोडवण्यासाठी दंड व शुल्क द्यावे लागले . जर 8 दिवसात वाहन सोडवले नाही तर त्याचा लिलाव केला जाईल असे नोटीशी द्वारे बजावले जात आहे . 

 

प्रभाग क्र . 9  मध्ये 20 तर प्रभाग क्र . 22 मध्ये 18 अशी एकूण 38 भंगार वाहने सर्वेक्षणअंती निदर्शनास आली आहेत . तर प्रभाग क्रमांक 15,16,17 मध्ये बेवारस व भंगार अवस्थेत एकुण 25 वाहने आढळून आली आहेत असे आयुक्तांनी कळवले आहे . अन्य भागातील सर्वेक्षण व आकडेवारी घेणे सुरु आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर