महापालिकेने मागविले 1 लाख कोवीड 19 रॅपिड ॲन्टीजन किटस्; चाचण्या वाढविण्यावर पालिकेचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:46 PM2020-06-29T15:46:30+5:302020-06-29T15:46:38+5:30

ठाणे जिलह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने तातडीने हे किटस मागविण्यात आले आहेत.

Municipal Corporation orders 1 lakh Kovid 19 Rapid Antigen kits; Municipal Corporation's emphasis on increasing tests | महापालिकेने मागविले 1 लाख कोवीड 19 रॅपिड ॲन्टीजन किटस्; चाचण्या वाढविण्यावर पालिकेचा भर

महापालिकेने मागविले 1 लाख कोवीड 19 रॅपिड ॲन्टीजन किटस्; चाचण्या वाढविण्यावर पालिकेचा भर

googlenewsNext

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना कोवीड 19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या होण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 1 लाख कोवीड रॅपिड ॲन्टीजन किटस् मागविण्यात आले असून दोन दिवसांत ते किटस् प्राप्त होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपीन शर्मा यांनी दिली.

कोवीडच्या चाचण्या वाढविणे संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आदेश तसेच ठाणे जिलह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने तातडीने हे किटस मागविण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानेही यासंदर्भात मार्गदर्शक सूचना यापूर्वीच निर्गमित केल्या आहेत. कोवीड 19 विषाणूची लक्षणे आढळणाऱ्या संशयित रूग्णाची तसेच बाधित रूग्णांचे स्वॅब घेवून केवळ 30 मिनीटांमध्ये तात्काळ चाचणी अहवाल या रॅपिड ॲन्टीजन किटसच्या माध्यमातून शक्य होणार आहे. यामुळे चाचण्यांची संख्याही वाढणार आहे तसेच कोरोना कोवीड 19 वर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.

या संदर्भात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडून तसेच शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीमध्ये हे किटस खरेदी करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 1 लक्ष रॅपिड ॲन्टीजन किटस खरेदी ककरण्यात आली असून येत्या दोन दिवसात ते किटस महापालिकेस प्राप्त होणार आहेत.

विशेष म्हणजे या किटसच्या माध्यमातून स्वॅब घेण्यासाठी लॅबची गरज भासणार नसून ज्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने सर्वेलन्स सुरू आहे, ज्या ठिकाणी हॅाटस्पॅाटस जाहिर केले आहेत त्या ठिकाणी किंवा प्रतिबंधित क्षेत्रातही या किटसच्या माध्यमातून स्वॅब टेस्टींग करता येवू शकणार आहे. या कोवीड 19 रॅपिड ॲन्टीजन किटसमुळे जास्तीत जास्त चाचण्या होणार असून त्यामुळे संशयित रूग्णांची वेळेवर तपासणी करून त्यांच्यावर पुढील उपचार करणे सोयीचे ठरणार आहे.

Web Title: Municipal Corporation orders 1 lakh Kovid 19 Rapid Antigen kits; Municipal Corporation's emphasis on increasing tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.